नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आज आयुक्त शुभम गुप्तांनी आढावा बैठकीमध्ये महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेबाबत चांगलीच अधिकाऱ्यांची कानउघडणी केली सामान्य नागरिकांच्या आरोग्याबाबत आणि रस्त्यावरील स्वच्छतेबाबत कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर अति.आयुक्त रविकांत अडसूळ ,सहा आयुक्त सचिन सांगावकर ,डॉ प्रज्ञा त्रिभुवन ,अनिस मुल्ला यांच्यासह स्वच्छता निरीक्षकांनी भागात जाऊन स्वच्छता स्वच्छतेची पहाणी केली व संबंधितांना सूचना केल्या गेल्या काही दिवसांपासून स्वच्छता हा मुद्दा केंद्रस्थानी ठेऊन आयुक्त शुभम गुप्ता यांनी याबाबत विशेष मोहीम राबविण्यासाठी व सातत्याने तीनही शहरांच्या स्वच्छतेसाठी सर्व विभाग प्रमुख ,अतिरिक्त आयुक्त,उप आयुक्त व सहाय्यक आयुक्त यांना दिलेल्या सूचनानुसार स्वच्छतेबाबत नियोजन केले. याबाबत आयुक्त शुभम गुप्ता यांनी सर्व स्वच्छता निरीक्षक यांना आपल्या भागात स्वच्छतेबाबत मुकदम व कर्मचारी यांच्या समन्वय साधून सपूर्ण वार्ड निहाय स्वच्छता होईल याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणतीही हयगय अगर कसूर सहन केला जाणार नाही.असेही त्यांनी आज स्पष्ट केले आहे अतिरिक्त आयुक्त उपायुक्त व सहाय्यक आयुक्त हे आकस्मात कोणत्याही वार्डात आज पासून समक्ष जाऊन तपासणी करणार असून त्याची सुरुवात आज पासून झाली. आयुक्त शुभम गुप्ता हे देखील कोणत्याही भागांमध्ये अचानकपणे जाऊन स्वच्छतेबाबत तपासणी करणार असल्याने आरोग्य विभागाच्या घनकचरा विभागाची यंत्रणा आता अलर्ट मोड वर आहे. .
Discussion about this post