
मोहाडी : मोहाडी नगर पंचायत ने २ वर्षा पासून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ४२० चे घरकूल मंजूर झाले होते त्या पैकी २९३लोकांना घरकुलाचे लाभ देण्यात आले. गरजू लोकांनी उसनवारी कडून, दागिणे गहाण ठेवून घरकूल पुर्ण झाले. पहिला हफ्ता सर्वांना देण्यात आला बाकीचे घरकूल बांधकामाचे पैसै अंदाजे २ वर्षापासून देण्यात आले नव्हते. लाभार्थी वारंवार घरकूल चा उर्वरित निधी मागण्या करीता नगर पंचायत चे चकरा मारीत होते. या बाबत नगर विकास संघर्ष समिती ने कीत्येक वेळा निवेदनाद्वारे मागणी केलेली होती, पण नगर पंचायत ने साधी दखल ही घेतली नाही अखेर नगर विकास संघर्ष समिती मोहाडी ने आक्रमक पवित्रा घेत दि.२४/१२/२०२४ ला घरकूल लाभार्थी चे देयके ३०/१२/२०२४ पर्यंत अदा कऱण्यात यावे अन्यथा दि.३१/१२/२०२४ ला नगर पंचायत ला ताला ठोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलेला होता.
नगर पंचायत मोहाडी ने दिलेल्या निवेदनाची दखल घेत २३५ लाभार्थ्यांना निधी वाटप करण्यात आला असुन उर्वरित लाभार्थ्यांना केलेल्या कामाचा प्रगतीनुसार त्यांचा खात्यात वाटप करणे शुरू असल्याने नगर विकास संघर्ष समिती मोहाडी कडून उभारण्यात येणाऱ्या दि.३१/१२/२०२४ ला ताला ठोको आंदोलन मागे घेण्याचे लेखी पत्र मां. मुख्याधिकारी साहेब यांनी नगर विकास संघर्ष समिती चे पदाधिकारी रफिक (बबलू) सैय्यद, पुरूषोत्तम पात्रे, अनिल न्यायखोर, श्याम चौधरी, अफरोज पठाण, हंसराज निमजे, नितीन निंबारते, प्रकाश मारबते, अकील शेख,पुरूषोत्तम मारबते यांना दिलेले आहे. सदर घरकूल लाभार्थी च्या बँक खात्यात पैसे जमा होणे सुरू झाल्याने दि.३१/१२/२०२४ चा ताला ठोको आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे नगर विकास संघर्ष समिती चे पदाधिकारी यांनी कळविले आहे.
सदर ताला ठोको आंदोलनाचां इशारा देताच नगर पंचायत प्रशासन खडबडून जागे झाले व कामाला लागले हे विशेष मोहाडी शहरातील घरकूल लाभार्थी ने नगर विकास संघर्ष समिती चे आभार व्यक्त केलेले आहे..
Discussion about this post