
घोलवड येथे दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजी बोरनिल फाउंडेशन व सक्षम किसान ऍग्रो यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मण फळ लागवडीबाबत शेतकरी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत बोरनिल कंपनीचे संस्थापक श्री. नील सावे आणि सहसंस्थापक श्री. अक्षय लाड यांनी उपस्थित शेतकऱ्यांना लक्ष्मण फळ लागवडीसाठी उपयुक्त मार्गदर्शन केले.
याशिवाय सक्षम किसान ऍग्रोच्या प्रतिनिधी श्रीमती स्नेहल वाकळे व श्री. मनोज वाकळे यांनी सेंद्रिय शेतीच्या महत्त्वाबरोबरच लक्ष्मण फळ लागवडीतून होणारे आर्थिक व पर्यावरणीय फायदे याबद्दल सखोल माहिती दिली.
कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना बोरनिल प्रोसेसिंग युनिटची भेट तसेच लक्ष्मण फळ लागवडीचे प्रत्यक्ष प्लॉट दाखवण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना या शेती पद्धतीचे तांत्रिक व व्यावसायिक पैलू समजून घेण्याची संधी मिळाली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आपले प्रश्न मांडले, त्यावर सविस्तर उत्तर दिले गेले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बोरनिल फाउंडेशनचे मोलाचे सहकार्य लाभले. शेवटी, उपस्थित शेतकऱ्यांना लक्ष्मण फळ लागवड सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाने उपस्थित शेतकऱ्यांमध्ये लक्ष्मण फळ लागवडीबाबत उत्साह निर्माण केला..
Discussion about this post