खांडबारा– नवापूर तालुक्यातील श्रावणी केंद्राची शिक्षण परिषद नगारे येथील जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आली या परिषदेत विविध शैक्षणिक विषय व उपक्रमाबाबत चर्चा करण्यात आली
परिषदेचे अध्यक्ष स्थानी गटशिक्षणाधिकारी आर.बी. चौरे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी शीलवंत वाकोडे ,सरपंच अनिता आनंद नाईक ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मगन गावित, केंद्रप्रमुख महेंद्र नाईक उपस्थित होते.
यावेळी विविध शैक्षणिक उपक्रमाबाबत तसेच केंद्रातील सीआरसी सदस्यांनी निपुण सुधारित लक्ष, माझे वर्ग माझे नियोजन ,अध्ययन निष्पत्ती वर आधारित गटकार्य, अध्ययन निष्पत्ती वर आधारित घटकांवर शिक्षकांनी सादरीकरण केले.
शैक्षणिक उपक्रमाबाबत चर्चा घडवून आणली केंद्रप्रमुख महेंद्र नाईक यांनी प्रशासकीय सूचना दिल्या ,गटशिक्षणाधिकारी आर.बी.चौरे यांनी शिक्षकांना अपार आयडी, महावाचन उपक्रम,शालेय पोषण आहार यु-डायस प्लस, आदीबाबत माहिती दिली.
शिक्षण विस्तार अधिकारी शीलवंत वाकोडे यांनी शासनाच्या विविध उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले.
चर्चेत ढोंग शाळेचे धीरज खैरनार, श्रावणी शाळेच्या सीमा पाटील व ज्ञानप्रकाश फाउंडेशनच्या क्रांती सोनवणे यांनी सहभाग घेतला.
परिषदेला श्रावणी केंद्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते.
सूत्रसंचालन वासू वसावे यांनी केले आभार मुख्याध्यापक गणेश पाडवी यांनी मानले.
परिषदेच्या यशस्वीतेसाठी नगारे शाळेच्या शिक्षिका वैशाली कोकणी वासू वसावे सुनीता वसावे रोशनी वसावे व मुख्याध्यापक गणेश पाडवी यांनी परिश्रम घेतले.
Discussion about this post