विहिरगांव प्रतिनिधी :- रजत चांदेकर

दहेगाव येथे दिनांक 30 12 2024 ला अतिशय आनंदाने श्री. जगन्नाथ महाराज यांचा प्रगटदिन उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी श्री जगन्नाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून भजनाच्या गजरात पालखीला सजावट करून प्रतिमेला पालखीत बसवून गावातून प्रमुख मार्गांनी दिंड्या भजने यांच्यासह वाजत गाजत पालखी यात्रा काढण्यात आली दहेगाव हे गाव भक्तिमय वातावरणात डुबून गेल अस पंढरपूर दिसायला लागलं यामध्ये गावातील महिला भजन मंडळ व पुरुष भजन मंडळ आणि इतर गावकऱ्यांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाचे आयोजनश्री. जगन्नाथ महाराज महिला भजन मंडळ यांनी केले होते तर कार्यक्रमाला अनेक भजन मंडळी उपस्तित होतेश्री. गुरुदेव महिला भजन मंडळ दहेगाव, श्री. जगन्नाथ महिला भजन मंडळ दहेगाव, श्री. गुरुदेव सेवा मंडळ दहेगाव, जय हरी माऊली हरिपाठ मंडळ, इत्यादी भजन मंडळ उपस्तित होते तर या कार्यक्रमाला गावातील मोठया संख्येने भाविक उपस्तित होते
Discussion about this post