*नव्या वर्षात सहकारी संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार उद्यापासून 2025 या नववर्षाला सुरवात होणार आहे. या नववर्षाच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे वर्षभर रखडलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल नववर्षाच्या सुरुवातीला वाजणार आहे. कारण राज्य सरकारने राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांसह इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 31 डिसेंबर 2024 पर्यंत स्थगिती दिली होती.
मात्र आता रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण प्रक्रिया सुरू करणार आहे. त्यामुळे आता लवकरच सहकारी संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार असल्याचं बोललं जात आहे.
Discussion about this post