तालुका प्रतिनिधी : उमेश कोटकर
नियम मोडणाऱ्यांवर होणार कडक कारवाई
चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी संपूर्ण जिल्हाभर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाही करण्याचे आदेश दिल्या नंतर काल पासुन संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस तसेच वाहतूक शाखा विशेष ऍक्शन मोड वर आलेली आहे. विविध कलमच्या आधारे नियमाना धाब्यावर बसवत वाहतुकीच्या नियमांना केराच्या टोपल्या दाखवणाऱ्या बेशिस्त वाहनचालकाला लगाम लावण्यासाठी संपूर्ण जिल्हा पोलीस यांनी विशेष मोहिम सुरु केली आहे.
यातच शेगाव पोलीस यांनी सुद्धा आता विना हेल्मेट, विना लायसन्स, ट्रिपल सीट, रॅश ड्राइव, ड्रिंक अँड ड्राईव्ह, अल्प वहीन (१८ वर्षा खालील ) वाहन चालक यांचेवर कारवाई करण्यात सुरुवात केली आहे.
त्या नुसार शेगाव पोलीस यांनी काल पासून काल आणि आज सायंकाळ पर्यंत इतर वाहतूक नियम मोडणाऱ्या ५५ वाहन चालक यांचे वर कारवाई केली असून, मागील वर्ष भरामध्ये ५२ ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करण्यात आली आहे.
त्या मुळे नवीन वर्ष चे स्वागत करतांना अति उत्साहात धोकादायक पद्धतीने, मद्य प्राशन करून व वाहतुकीचे नियम मोडू नये व येणाऱ्या वर्षाचे विना अपघात होता साजरे करावे व आपले तसेच इतरांचे प्राण वाचवून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हाहन शेगाव पोलीस यांनी जनतेला केले आहे. व येणाऱ्या नवीन वर्षाच्या पोलीस विभागाकडून समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहे.
Discussion about this post