वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेले तसेच शिवसेना ठाणे शाखा आणि ‘रक्तानंद’ ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या या शिबीराचे यंदा ३० वे वर्ष असून यानिमित्ताने मीही रक्तदान करून २०२५ या नवीन वर्षाचे स्वागत केले.
यावेळी दरवर्षी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना ‘रक्तानंद’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यासोबतच या शिबिरात रक्तदान करणाऱ्या ठाणे शहरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. तसेच पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी तयार केलेल्या दिनदर्शिकांचे अनावरणही करण्यात आले.
यावेळी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना आगामी वर्ष हे सर्वांना सुख, समाधान आणि आनंद देणारे ठरो याच शुभेच्छा दिल्या.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेवक मनोज शिंदे, शिवसेनेच्या ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ.मीनाक्षी शिंदे, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, बाळा गवस तसेच शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ठाणेकर नागरिक आवर्जून उपस्थित होते.
Discussion about this post