स्वातंत्र्य दिवस उत्सव
आज भांबेवाडी येथे आपल्या 78 व्या स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत हा उत्सव पार पडला. यावेळी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवर
गावचे सरपंच केशव वाघचवरे, उप सरपंच केशव नवनाथ वाघचवरे, ग्रामसेवक सोनावणे, कृषी अधिकारी विकास पाटील, मेजर उद्धव आरेकर, पत्रकार राहुल वाघमारे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
ध्वजारोहण आणि विद्यार्थ्यांचे मनोगत
स्वातंत्र्य दिवसाच्या मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण मेजर उद्धव आरेकर यांच्या हस्ते पार पडले. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून स्वातंत्र्यदिनीचे महत्व उलगडले. यामुळे उपस्थित मान्यवर आणि गावकरी मोठ्या उत्साहात सहभागी झाले.







Discussion about this post