तालुका प्रतिनिधी/सारथी महाराष्ट्राचा, वाल्मीक सूर्यवंशी
निलंगा तालुक्यातील निटूर येथील जि.प.प्रशाला शाळेमध्ये ७८ व्या स्वातंञ्य दिनानिमित्त एसएससी बॅच-१९९४ मधील बॅचने पुढे व्हाॅटसअप गुृपच्या माध्यमातून मैञी फाउंडेशन बचत गटाची स्थापना करून आम्ही स्नेहमेळावे व ज्या शाळेत आम्ही शिक्षणाचे धडे घेतलो त्या शाळेचे कांही तरी दायित्व म्हणून सामाजिक व दिशादर्शक उपक्रम हाती घेण्याचा संकल्प घेऊन या गुृपने शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ठेवण्याचे एकमताने मंजूर करण्यात आला.
गेल्या वर्षांपासून हा उपक्रम हाती घेण्यात आला आणि शालांत परिक्षा-२०२४ च्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रथम वैष्णवी माधव कवडे हिला स्मृतिचिन्ह रोख रू.२१०१ , व्दितीय वैष्णवी सोलंकर हिला स्मृतिचिन्ह रू.११०१ तर तृतीय अंजली शिंदे हिला स्मृतिचिन्ह रू. ५५१ रूपये मैञी फाउंडेशन बचत गटातील सदस्यांच्या वतीने देण्यात आले.
जि.प.प्रशाला शाळेतील गुणवत विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी सदस्यांनी आम्ही शैक्षणिक सञातील विद्यार्थ्यांनी अभ्यास करून मोठ्या प्रमाणात उच्चांक ठक्केवारी उत्तीर्ण होण्यासाठी आमचा हा सामाजिक व दिशादर्शक उपक्रम आम्ही दरवर्षी राबवणार असल्याची प्रतिक्रिया याप्रसंगी व्यक्त केली आहे.
याप्रसंगी गणीपाशा शेख,अंकुश कवडे,पद्माकर निटूरे,धोंडीराम सोळुंके,जगन्नाथ बसवन्ने,प्रशांत साळुंके श्रीनिवास सोमवंशी तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी राजकीय मंडळींची उपस्थिती होती.

Discussion about this post