एक कोटी रुपयाचे बांधकाम
माती मिश्रित व बिगर परवाना रेती- झरी जामणी तालुक्यातील शेवटच्या टोकावरील आदिवासी पेसा कायाद्यातील आदिवासी महिला सरपंच असलेल्या मांडवी या गावातील शाळेच्या इमारत बांधकाम हे भ्रस्ट व निकृस्ट दर्जाचे बांधकाम होत असून सुरुवातीला पासूनच या इमारतीचे पिलरचे खोदकाम हे पाच फूट खोल न खोदता फक्त्त दोन फूट खोल खोदाई केल्याने हे इमारत टिकेल कि विकेल हा प्रश्न येथील जनतेला पडला आहे येथे या शाळेत फक्त्त गरीब आदिवासी जनतेचे मुले या शाळेत शिक्षण घेतात. जर ही इमारत पडली व काही अनर्थ झाल्यास यात गरीब लोकांचे मुलेच सापडतात त्यांचे खूप मोठे नुकसान होईल. या कामात ज्यापद्धतीने लोहाच्या सळा खीचा वापर कारायाला पाहिजे त्या पद्धतीने वापर करण्यात आला नाही. पिलर मध्ये 12mm चे रॉड वापरायला पाहिजे ते वापरण्यात आले नाही. 13 इंच चे पिलर चा वापर न करता 9 इंचाचा पिलर व त्यातील रिंगा 6 इंचावर असणे गरजेचे आहे मात्र हे दूर दूर दोन फुटावर रिंगा आहेत येथील इंजानियर येतात व आपला खिसा गरम करून जात असल्याचे गावात बोलल्या जात आहे.त्या मुळे येथील जेई व संबंधित बांधकाम विभाग या कामावर गांभीर्याने लक्ष देऊन या होऱ्या निकृष्ट दर्जाच्या कामावर नजर ठेऊन काम योग्य पद्धतीने करून घ्यावे अशी येथील जनतेची मागणी होत आहे.
येथील ठेकेदार हा राजकीय हित संबंधित असलेला लोकांसोबतहात मिळवणी असल्याने हा ठेकेदार वाटेल त्या पद्धतीने काम करून आपला खिसा गरम करण्याच्या मार्गांवर आहे. त्या मुळे येथील राजकीय लोकांच्या बडावर या कामात मोठा भ्रष्टाचार होतांना दिसत आहे. या कामाची चौकशी करून कामात होणारा भ्रष्टाचार थांबावावा अशी येथील जनतेची मागणी होत आहे.
Discussion about this post