माननीय, राष्ट्रपतीजी भारत सरकार नई दिल्ली मार्फत. मा. तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय चांदुर बाजार, महाराष्ट्र. विषय. 1.मा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घेणेबाबत तसेच परभणी येथे घडलेल्या प्रकरणातील प्रमुख मागण्या व इतर मागण्या करिता तहसील कार्यालय चांदुर बाजार येथे जाहीर आंदोलन आज दिनांक 31/12/2024 रोजी सकल बहुजन समाज चांदुर बाजार च्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे गत 17डिसेंबर 2024ला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी विशवरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी संसद मध्ये अपमान केला. संवैधाणिक पदावर असून देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या अपमानाचा सकल बहुजन समाज जाहीर निषेध करतो. त्याचप्रमाणे परभणी येथे संविधानाची विटंबना झाली असता सोमनाथ व्यंकट सूर्यवंसी व इतर संविधान राक्षकांनी निषेध केला असता पोलीस यंत्रने कोम्बिंग ऑपरेशन चालवून त्यांच्या नावाखाली त्यांना घरात घुसून मारहाण करण्यात आली त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करून पोलीस कोथडीत त्यांना अमानुष पणे मारझोड करण्यात आली अश्यातच सोमनाथ व्यंकट सोमवंशी याचा मृत्यू झाला याला जबाबदारअसलेल्या पोलीस यंत्रनेचा व गृहमंत्र्याचा जाहीर निषेध करीत खालील मागण्या करीत आहे.
प्रमुख मागण्या:-
1)देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसद भावनात विशवरत्न संविधान निर्माते डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अपमानकारक वक्तव्य केले या प्रकरणी त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांचा राजीनामा घेण्यात यावा
2)परभणी येथे झालेल्या संविधानाच्या विटंबना प्रकरणी सी बी आय चौकसी करून देशद्रोहचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर कार्यवाही करण्यात यावी.
3)शाहिद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी (विद्यार्थी )यांची पोलीस कोथडीत हत्या करण्यात आली. संबंधित हत्याकांडाची सी बी आय कडून चौकसी करून दोषीवर कार्यवाही करण्यात यावी.
4)अचलपूर येथे बुद्ध विहारासमोर काही समाज कंटाकांनी त्रिशूल गाडलेत व तेथे असलेल्या डाँ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्धच्या मूर्तीवर दगड फेक करून विटंबना करणाऱ्यांना तात्काळ अटक करून गुन्हे दाखल करण्यात यावे
5)शहरात व गावात असलेल्या प्रत्येक बुद्धिविहावर सी. सी टीव्ही कॅमेरे लावण्यात यावे ज्या सर्व ठिकाणी महापुरुषांचे पुतळे आहेत त्या ठिकाणी सुद्धा सी सी टीव्ही कॅमेरे लावण्यात यावे
6)मा. सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण पणे हत्या करण्यात आली. तरी पण त्यांचे मारेकरी अजूनही मोकाट फिरत आहे त्याच्यावर गुन्हे दाखल करून सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्यात यावा तसेंच वरील मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र भर करण्यात येईल.
Discussion about this post