⁉आपला पाल्य देखील तासन तास मोबाईल हातात घेऊन बसतो का?
⁉मोबाईल पाहत असताना आपल्या पाल्याला देखील कशाचेच भान राहत नाही का?
⁉आपल्या पाल्याने रडू नये / गोंधळ करू नये म्हणून तुम्ही देखील त्याच्या हातात मोबाईल देता का?
लहान मुलांच्या आरोग्याविषयी अत्यंत खळबळ जनक माहिती समोर येतीये! आपली लहान मुले आपले ऐकत नाहीत, गोंधळ घालतात म्हणून अनेक पालक त्यांना मोबाईल पाहायला देतात. मोबाईल वर विविध रील्स आणि विडिओ पाहून लहान मुलांचे मनोरंजन होईल, ते शांत एका जागी बसतील किंवा आपल्या घरातील कामात अडथळा आणणार नाहीत असा समज बहुतांश पालकांचा असतो.
मात्र ही सवय त्या चिमुरड्या जीवांच्या आयुष्यावर मोठा नकारात्मक परिणाम करणारी आहे. मोबाईल मध्ये एका टच वर खूप नवनवीन गोष्टी पाहायला मिळतात. सतत मोबाईल पाहत बसणे खालील प्रकारे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम करतात.
📵 सतत मोबाईल स्क्रीन अत्यंत जवळून व जास्त कालावधी साठी पाहिल्याने डोळ्यांमध्ये कोरडेपणा येणे, दृष्टी कमजोर होणे, डोळ्यांना सतत पाणी येणे, चष्मा लागणे, डोळ्यांचा नंबर वाढणे, डोळे दुखणे, रात्री झोप न येणे, नेहमी पोट खराब होणे इ.
📵स्वभाव रागीट व चिडचिडा होणे. कुणाशी जास्त न बोलणे. एकटे बसणे. बाहेर खेळायला न जाणे. अत्यंत हट्टी स्वभाव बनत जाणे.
📵अभ्यासात लक्ष न लागणे. वाचलेले न आठवणे. अभ्यास करण्याची इच्छा न होणे. नेहमी रड रड करणे.
📵 तब्येत न सुधारणे. किडकीडीत बांधा राहणे. वयानुसार शारीरिक व मानसिक वाढ न होणे / वाढ खुंटणे!
पालकांनो आपल्या लहान मुलांमध्ये देखील अशी लक्षणे दिसत असतील तर लवकरच सावध व्हा!
लहान मुलांना काय बरोबर काय चुकीचे ही समज नसते. त्यांच्या डोळ्यासमोर येणारी प्रत्येक गोष्ट त्यांना खरी वाटत असते. मोबाईल वर सतत वेगवेगळ्या काल्पनिक गोष्टींचा भडीमार पाहून त्यांचा वास्तविक जगाशी संपर्क तुटायला लागतो. आभासी जाळ्यामध्ये अशी मुलं वावरायला लागतात आणि मग स्वमग्न होतात. मानसिक व शारीरिक स्तरावर इतर मुलांच्या तुलनेत मागे पडायला लागतात.
यावर उपाय काय कराल?❓❓❓
✅मुलांना उगाच सारखा मोबाईल देणे त्वरित बंद करा!
✅मोबाईल, टी. व्ही. यांवर मुले काय पाहतात यावर बारकाईने लक्ष ठेवा.
✅लहान मुलांसमोर मोबाईल अथवा टीव्ही / कॉम्पुटर यांवर उगाच वेळ घालवत बसू नका!
✅त्यांना नियमित बाहेर मैदानात खेळायला पाठवा.
✅नवीन लोकांशी / मुलांशी त्यांच्या ओळखी करून दया. त्यांना नवीन लोकांत मिसळायला शिकवा.
✅रोजचा काही ठराविक काळ त्यांना निसर्गाशी एकरूप होता येईल अशा ठिकाणी घेऊन जात चला. (उदा.गार्डन, शेती, पार्क इ.)
✅त्यांच्याशी संवाद साधा. घरात कितीही काम असले तरी मुलांना खास संवादासाठी वेळ देत चला. त्यांना प्रत्येक गोष्टींत सामावून घेण्याचा प्रयत्न करा.
✅त्यांची योग्य शारीरिक व मानसिक वाढ होण्यासाठी नियमित सुवर्णप्राशन सारखे औषध सुरु करा.
घाई गडबडीच्या आयुष्यात पालक आपल्याला मुलांना सर्व काही देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. मात्र नकळत अशा काही गोष्टी घडत जातात व त्यांचे गंभीर परिणाम नंतर दिसायला लागतात. म्हणून आताच सजग व्हा. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी योग्य ती पावले उचला!
चला हा संदेश आपल्या मुलांच्या कल्याणासाठी राबणाऱ्या सगळ्या पालकांपर्यंत पोहोचवू या.

चला हा संदेश आपल्या मुलांच्या कल्याणासाठी राबणाऱ्या सगळ्या पालकांपर्यंत पोहोचवा.
Discussion about this post