प्रतिनिधी:- विजय बारस्कर
3 जानेवारीला असून एक महान शिक्षिका समाज सुधारक आणि महिला अधिकार कार्यकर्ता आहे त्यांनी महिला आणि शिक्षा व अधिकार यावरती काम केलेले आहे भारताच्या इतिहासामध्ये एक महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झालेले आहे
सावित्रीबाई फुले यांनी पती ज्योतीराव फुले यांच्यासोबत महिलांकरिता पहिले शाळा एक जानेवारी 1848 रोजी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले ज्ञान क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी पहिली मुलींची शाळा काढून एक नवक्रांती घडविले त्यानंतर सर्व समाजाला शिक्षणाचा हक्क मिळवून त्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाळा उघडल्या. त्यांनी सामाजिक शैक्षणिक उत्थानासाठी केलेले योगदान म्हणून एक जानेवारी हा दिवस राष्ट्रीय शालेय दिन म्हणजेच फुले दांपत्य सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांनी महिलांच्या अधिकारासाठी शाळा काढून लढाई लढली समाजातील स्त्रियांना बराबरीचा व सन्मानाची जागा देण्याकरिता काम केले सावित्रीबाई फुले ही जयंती महिला अधिकार दिवस म्हणून गावोगावी साजरी केल्या जाते आणि त्यांच्या योगदानाचे जागृती करून दिल्या जातात
याच प्रकारे आज मंगलादेवी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन व माल्या अर्पण कार्यक्रमाचे नऊ वाजता आयोजन केलेले आहे समाज बंधूंनी या कार्यक्रमाकरिता उपस्थिती प्रार्थनीय आहे असे माळी बहुउद्देशीय संस्था मांगलादेवी यांनी जाहीर केले आहे
Discussion about this post