.
दिनांक – १ जानेवारी २०२४ हिंदू धर्मात गाय हे पवित्रतेचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे. हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्त्वाचे स्थान आहे.राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी राज्यात गाईला मातेचा दर्जा बहाल केला आहे. अशा गौ मातेच्या सुरक्षेसाठी शहरातील वर्धमान गौरक्षण संस्थेच्या मालकीचे गोरक्षन चे अद्यावत होण्यासाठी वर्षभरापूर्वी मतदार संघाचे मा आमदार डॉ संजय रायमुलकर यांच्या प्रयत्ना मधून २ कोटि ८० लक्ष रु निधि मंजूर झाला या निधितुन गौरक्षण च्या ६ एक्कर भूखंडाला संरक्षण भींत आणि अद्यावत सामाजिक सभागृहाचे बांधकाम होणार आहे आज आचार्य श्री च्या उपस्थिती मध्ये या शुभ कामाचे भूमिपूजन होत असल्याने गौ प्रेमी साठी आनंदाची बाब असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा बळीराम मापारी यांनी भूमिपूजन प्रसंगी केले.
शहरात रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गाईंचे सरंक्षण होण्यासाठी जैन समाजाच्या वतिने मोठे गौरक्षण अनेक वर्षा पासून कार्य करत आहे. पशुधन मालकां कडून आपल्या पशुधनाचे संगोपान होत नसल्याने ते आपली जनावरे रस्त्यावर मोकाट सोडून देतात अशावेळी या जनावरांचे संगोपान होण्यासाठी दानशूर आणि जीवदया मध्ये अग्रेसर असलेल्या असलेल्या जैन समाजाच्या मालकीच्या गौरक्षण मध्ये या गाईना आश्रय देऊन त्यांचे संगोपान केले जाते आज जैन समाजाच्या वर्धमान गौरक्षण मध्ये १०० च्या वर गाईंचे संगोपान सुरु आहे. अशावेळी समजातील जेष्ठ मंडळीनीं शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा बळीराम मापारी यांच्या माध्यमातून माजी आ ड़ॉ संजय रायमुलकर यांच्या जवळ गौरक्षण साठी निधि ची मागणी केली होती जैन समाजाच्या मागनीला डॉ संजय रायमुलकर यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देऊन जवळपास २ कोटि ८० लक्ष रु निधि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून मंजूर करून आणला आज जैन आचार्य प. पु. पुण्यप्रभावी पूज्य मुनिराज श्री युगंधर विजयजी म.सा तपस्वी पूज्य पन्यास श्री धनजयविजयजी म.सा. प्रवचनकार पूज्य पन्यास श्री धनजयविजजी म.सा. बालमुनिराज श्री तपोजयविजयजी म.सा.साधुजी महाराज तसेच सौम्यप्रज्ञा श्री जी म.सा. ,विनीतप्रज्ञा श्री जी म. सा.,जिनदर्शना श्री जी म सा.,तारुन्यताश्री जी म.सा.यांच्या उपस्थिति मध्ये संरक्षण भिंतिच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा बळीराम मापारी, श्री श्वेतांबर मुनिसुव्रत जैन संघाचे अध्यक्ष शांतिलाल सिंगी,वर्धमान स्थानकवासी संघाचे अध्यक्ष भीकमचंद डोंगरवाल, माजी प्राचार्य भीकमचंद रेदासनी, श्री श्वेतांबर तेराहपंथ संघाचे रामचंद्र कोचर, डॉ संतोष संचेती, अक्षय संचेती, नवीनचंद संचेती, निर्मल संचेती, विजय गोलेच्छा, सुमित बोरा, अक्षय सुनील संचेती, इत्यादि मान्यवर उपस्थित होते
वर्धमान गौरक्षण मध्ये संरक्षण भींत आणि सामाजिक सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन करतांना प्रा बळीराम मापारी, उपस्थित जैन आचार्य व समाज बांधव

Discussion about this post