महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो हिंदू मुस्लिम समाजातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मिरजेतील ख्वाजा मीरासाहेब दर्ग्याच्या यांच्या ६५० व्या उरुसाला २५ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. चर्मकार समाजाचा मानाच्या गलेफने उरुसाची सुरुवात होईल या उरुसाचे एक वैशिष्ठ म्हणजे येथील दर्गा परिसरात एक पुरातन चिंचेचे झाड आहे त्याखाली दर वर्षी या उरुसानिमित्त संगीतरत्न अब्दुल करीम खा यांच्या स्मृती प्रित्यर्थ तीन दिवस संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते या संगीत महोत्सवात देशभरातील दिग्गज कलाकार आपली संगीत सेवा अर्पण करत असतात. विशेष करून किराणा घराण्यातील कायक कलाकार आपली सेवा अर्पण करतात. उरुसापूर्वी विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली. मुस्लिम समाजामध्ये बुधवारी चंद्र दर्शन झाल्यावर दर्गा आवारामध्ये शिडी उभी करून विविध पारंपरिक धार्मिक विधींना सुरुवात झाली. उरुसानिमित्त मिरज शहर पोलीस ठाण्यापासून दर्गा रस्त्याच्या दुतर्फा खरेदीसाठी विविध खेळणी आणि इतर वस्तूंचे स्टोल उभे केले जातात. दर्गा इमारतीस आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते. मिरजेतीलसर्व धर्मीय मंडप डेकोरेटर्स नी त्यांच्या साहित्यांची मिरवणूक काढून या रोषणाईस सुरुवात केली. प्रथेप्रमाणे १६ जानेवारीला मंडप उभारणीचा कार्यक्रम होईल दर्गा खादिम जमात तर्फे महापालिका प्रशासनाकडे रस्ते दुरुस्ती पिण्याच्या पाण्याची सोय स्ट्रीट लाईट ची व्यवस्था करावी यासाठी निवेदन दिले आहे त्याप्रमाणे महापालिकेमध्ये आज ५ वाजता उरुसाच्या नियोजनासाठी प्रशासनाच्या सर्व विभागांची बैठक आयोजित केली आहे.
Discussion about this post