
सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शितल तेली उगले यांना भारतीय प्रशासन सेवेच्या आधिकालिक वेतनश्रेणीत स्थानापन्न पदोन्नती मिळाल्या निमित्त ईच्छा भगवंताची मित्र परिवाराचे मार्गदर्शक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी पालिका आयुक्त शितल तेली उगले यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
सोलापूर महानगरपालिकेवर प्रशासक असून देखील सोलापूर शहराचा देखील विकासाच्या दृष्टीने कायापालट होत आहे. असेच आपल्या हातून या पुढील काळात देखील सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य घडो अश्या शुभेच्छा देखील पालिका आयुक्त शितल तेली उगले यांना यावेळी किसन जाधव यांनी दिल्या.

तसेच सोलापूर महानगरपालिकेतील झोन क्र. ६ चे नवनियुक्त झेडो तथा सहाय्यक आयुक्त सारिका मगर यांचा इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


दरम्यान नगर अभियंता विभागातील नवनिर्मित पदोन्नती झालेले सहाय्यक अभियंता सलीम बक्षी, मुन्ना तळीखडे, अविनाश कांबळे रियाज सिद्दिकी तसेच विद्युत विभागातील कोल्हे आणि गायधनकार या कर्मचाऱ्यांना शाल, मखमली टोपी आणि पुष्पगुच्छ देऊन किसन जाधव यांनी यावेळी सत्कार केला. येणारा काळामध्ये आपल्या हातून जनसेवेचे कार्य अखंडित सुरू राहावे आपले आरोग्य व कौटुंबिक जीवन सुखमय अशा शुभेच्छा यावेळी किसन जाधव यांनी पदोन्नती निमित्त सत्कार सोहळा प्रसंगी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. सचिन अंगडीकर, महादेव राठोड, माणिक कांबळे, वसंत कांबळे आदींची उपस्थिती होती.
Discussion about this post