पन्हाळा, 31 डिसेंबर: पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावर्डे येथील विद्या मंदिर शाळेत कु. समिक्षा विजय यादवचा सन्मान करण्यात आला. कु. समिक्षा यादवची प्रतिष्ठित गोदरेज प्रोपर्टिज कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून निवड झाल्याबद्दल हा गौरव करण्यात आला. तिच्या यशाचा उत्सव साजरा करत, शाळेच्या वतीने महेश बच्चे आणि रघुनाथ इंगवले गुरुजी यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात कु. समिक्षा यादव हिने उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तिने कठोर परिश्रम आणि दृढ इच्छाशक्तीने कसे मोठे यश मिळवता येते, यावर आपले विचार मांडले.
कार्यक्रमाला सरपंच बाळासाहेब पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश बच्चे, रघुनाथ इंगवले गुरुजी.बाजीराव बच्चे गुरुजी.तसेच मुख्याध्यापक दत्तात्रय आसगावकर सर, रणसिंग सर, गोरड सर, पाटील सर, माळी मॅडम, जगदाळे मॅडम, देवकर मॅडम, बच्चे मॅडम.पत्रकार सुनिल पाटील यांसह शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर उपस्थित बाजीराव बच्चे गुरुजी यांनी या यशस्वी विद्यार्थिनीचे कौतुक केले. शाळेने आयोजित केलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठरला.
Discussion about this post