सध्या सह्याद्रीच्या निसर्गरम्य घनदाट जंगलामध्ये वाघोबाचा वावर आढळून आला आहे. संख्याही वाढली आहे वनविभागाच्या कॅमेऱ्यांमध्ये वाघोबा चे दर्शन अधून मधून होत आहे राधानगरी पासून गोवा पर्यंतच्या घनदाट जंगलांमध्ये वाघोबाचे अस्तित्व आहे मध्ये झालेल्या गणनेमध्ये संख्या हि वाढल्याने निसर्गप्रेमींकडून समाधान व्यक्त झाले. आता यामध्ये आणखीन भर पडणार आहे यवतमाळ मधील टिपेश्वर अभयारण्यातून काही दिवसा पूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी परिसरात वाघोबाने दर्शन दिले आहे त्याचा वावर या भागात आढळून आल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण होते तर वाघोबाला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प किंवा कोयना प्रकल्पाच्या जंगलपट्ट्यात सोडण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्यात आला असून मान्यता मिळाल्यास या दोनही ठिकाणी अधिवासासाठी संघर्ष उद्भवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी यवत माळमधून बार्शी कडे धाराशिव मार्गे वाघोबाने सुमारे ५०० किमी चा प्रवास केला आहे बार्शी ते धाराशिव टापूत त्याचा वावर आढळून आला आहे सोलापूर वन विभागाने या बाबत त्याच्या सह्याद्री किंवा कोयना स्तलांतराचा प्रस्ताव शासनाकडे पाठवल्याचे खात्रीशीर रित्या समजते. वन विभागाच्या अलीकडील निरीक्षणानुसार सह्याद्री खोऱ्यात एस टी आर टी १ या वाघाचे अस्तित्व आढळून आले आहे. २३ साला मध्ये डिसेंबर महिन्याच्या २३ तारखेला तो पहिल्यांदा कॅमेऱ्यात दिसून आला. मात्र अजून एका वाघाचे स्तलांतर या भागात झाले तर अधिवासासाठी संघर्ष होणार हे निश्चित
Discussion about this post