प्रयागराज येथे होणाऱ्या भव्य दिव्य कुंभमेळ्याला मिरजकर नागरिकांची उपस्थिती लागू शकते होय. मिरज ते जयनगर हि विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस रेल्वे गाडी मिरजेतून सुरु होत आहे. मिरजेतूनबिहार हा प्रवास हि रेल्वे करणार आहे. नुकतीच रेल्वे बोर्डाने या साप्ताहिक धावणाऱ्या रेल्वे गाडीला परवानगी दिल्याने मिरजेतील व्यापारी उद्योजक आणि भाविकांची चांगली सोय यानिमित्ताने होणार आहे. तसेच कोल्हापूर अहमदाबाद या गाडीचा विस्तार राजकोट पर्यंत करण्यात आला आहे. विशेष एक्स्प्रेस जयनगर येथून दर मंगळवारी रात्री ११.५० मिनिटांनी सुटणार आहे मिरज जंक्शन मध्ये ती गुरुवारी रात्री ११.४५ वाजता दाखल होईल. मिरज मधून हि रेल्वे जयनगर कडे दर शुक्रवारी सकाळी १०. १५ मिनिटांनी रवाना होईल जयनगर येथे ती रविवारी सकाळी ९.३० वाजता पोचेल. या गाडीसाठी पुणे मनमाड प्रयागराज, पं दीनदयाळ उपाध्याय बक्सर दानापूर पटना समस्तीपूर आणि दरभंगा या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. या गाडीमुळे मिरज आणि कर्नाटकातील बहुतांश व्यापारी उद्योजक आणि भाविकांची चांगली सोय होणार आहे. येणाऱ्या दोन आठवड्यात हि गाडी रुळांवर धावू लागेल अशी माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. आगामी प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी मिरजकर नागरिकांना हि रेल्वे सुखकर प्रवासाची ठरेल यात शंका नाही.
Discussion about this post