सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये आज तीनही शहरांमध्ये तब्बल १२०० स्वच्छता कर्मचाऱ्यांनी विशेष स्वच्छता महाअभियान राबवत १५ टन कचऱ्याचे संकलन केले. उपायुक्त वैभव साबळे यांच्या नियोजनानुसार हे महाअभियान पार पडले तर आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले कि अशा प्रकारे हि मोहीम नागरिकांच्या आणि प्रशासनाच्या सहयोगाने आणखी व्यापक करण्याचे आम्ही ठरवले आहे. आरोग्य अधिकारी (घनकचरा व्यवस्थापन) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अभियानामध्ये मनपा च्या तब्बल १२०० कर्मचाऱ्यांनी तीनही शहरातील प्रमुख मार्गाची सफाई केली सांगली मधील छत्रपती शाहू महाराज मार्ग, कुपवाड येथील चाणक्य चौक ते राजे होळकर चौकआणि मिरजकडे येणारा मुख्य रस्त्यावरील १५ टन कचऱ्याचे संकलन आज केले गेले. यापुढेही अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमेचे काम लोकसहभागातून आम्ही हाती घेऊ असा विश्वास उपायुक्त वैभव साबळे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला.
Discussion about this post