

भूम..
भूम येथील श्री चौंडेश्वरी देवी शाकंभरी पौर्णिमा महोत्सव ६३ व्या वर्षात ५ जानेवारी रोजी पासून अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमापासून सुरू होत आहे . या निमित्ताने अनेक अभ्यासू कीर्तन - प्रवचन - भारूडकारांचे कार्यक्रम होणार आहेत . भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.या सर्व कार्यक्रमाच्या भीती पत्रकाचे प्रकाशन समाज बांधवांच्यावतीने करण्यात आले.
ह भ प वैकुंठवासी गुरुवर्य रामदेव बाबा नेकनूरकर, आत्मचैतन्य महाराज म्हैसगावकर यांच्या कृपा आशीर्वादाने श्री चौंडेश्वरी देवी शाकंभरी पौर्णिमा 2025 हा महोत्सव ६३ व्या वर्षात ५ जानेवारी २०२४ पासून सुरू होत आहे.या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात होत आहे.
या अखंड हरिनाम सप्ताह दरम्यान ह भ प सर्जेराव काशीद माजलगाव, परमेश्वरीताई परभणे, भरत जोगी परळी वैजनाथ, ओंकार बाबर अहिल्यानगर, अर्जुन मोटे पळशीकर जालना, संग्राम भंडारे आळंदी देवाची, विलास गेजगे बोथिकर व रवींद्र हरणे मुक्ताईनगर महाराज यांचे कीर्तन व कृष्णा जोगदंड महाराज यांचा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे.शेवटी महाप्रसादाची महापंगत होणार आहे.या सर्व कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त कोष्टी समाज बांधवांच्यावतीने केले आहे.संपूर्ण कार्यक्रमा संदर्भात भितीपत्रके तयार केली आहेत.याचा प्रकाशन सोहळा जेष्ठ समाज बांधवांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जेष्ठ समाज बांधव अंबादास वरवडे , पांडुरंग वरवडे, कोष्टी समाज ट्रस्ट अध्यक्ष विठ्ठल बागडे, सचिव पत्रकार शंकर खामकर, कांतलिंग खामकर, आबा नवले, राम बाबर, अतुल उपरे, पांडुरंग बुगड , मधुकर उपरेसह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.
Discussion about this post