



भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
शेगाव येथील गजानन महाराज मंदिरा भोवती फेरी वाल्यांचा विळखा असल्याने गजानन भक्तांना या ठिकाणी खूपच त्रास सहन करावा लागतो आहे.विशेष करुन मंदिराच्या मुख्य दरवाजा जवळ आणि संपूर्ण रस्त्यावर फेरीवाल्यांचे साम्राज्य असल्याने भाविकांची खूप च गैरसोय होते.रस्त्यावर आणि मुख्य दरवाजा जवळ टाळ विकणारे,हार,गजरे, कपाळावर गंध लावणारे, मुख्य दरवाजा अडवून आपल्या वस्तू ची मोठ्या ओरडून, भाविकांच्या अगदी जवळ येऊन वस्तू तोंडापर्यंत नेऊन विक्री करताना दिसतात.मुख्य दरवाजा जवळ कर्तव्यावर असलेले सुरक्षा रक्षक ही कोणतीही फेरीवाल्यांवर करीत नाहीत.मंदिरापासूनचा बाहेरुन रस्ता तर फेरिवाले राजरोसपणे मोठं मोठ्याने ओरडून आपल्या वस्तू ची विक्री करताना दिसतात.पोलीस वाहन व वाहतूक नियंत्रण पोलिस ही फक्त मेन रस्त्यावर कर्तव्य करताना दिसतात.रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि मधोमध ही फेरीवाले आपली दुकाने थाटून आपल्या वस्तू ची विक्री करताना दिसतात.प्रासादिक वस्तू, फोटो ची दुकाने, चहा नाश्ता ची दुकाने,खेळणीची दुकाने, हळदी कुंकू,अशा फेरीवाले मुळे खरोखरच भाविकांची चालताना कोंडी होते, वृध्दांना, महिलांना,व लहान मुलांना येथे चालताना खूप च त्रास होतो.याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने फेरीवाले जास्तीत जास्त निगरगट्ट बनले आहेत.संबंधित अधिकारी वर्गाने या समस्ये कडे लक्ष देऊन फेरि वाल्यांवर वचक निर्माण करावा.असे सर्वसामान्य भाविकांना वाटते..
Discussion about this post