अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचा आज स्मृतीदिन, आपल्या लेकरांची माय होणं फार सोपं असतं मात्र अनाथांची माय होऊन पोटच्या लेकरा वाणी त्यांचा संभाळ करणे वाटतं तितकं सोपं नसतं, आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये आलेले संकट असंख्य अडचणी आंधारलेली काट्याकुट्याची वाट तुडवत प्रकाशाचा रस्ता शोधता शोधता हजारो दीनदुबळ्या गरीब अनाथ अशा लेकरांची माय होऊन या लेकरांना शिक्षण देऊन पोटापाण्याला लावून त्यांची लग्न करून सर्वांना सुखी समाधानानं जीवन जगता यावे म्हणून धडपडणाऱ्या माईंचे कार्य अवर्णनीयच…
सिंधुताईंना सुमारे 750 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थेंकडून सिंधुताई सपकाळ यांना सुमारे 270 पुरस्कार मिळाले आहेत. 2010 मध्ये त्यांच्यावर आधारित बायोपिक ‘मी सिंधुताई सपकाळ’ चित्रपटाच्या रूपाने प्रदर्शित झाला. त्यांना अनेक पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आलेले असून अगदी जीवनाच्या अंतापर्यंत त्या अनाथ मुलांचे भविष्य घडविण्यासाठी कार्ये करत राहिल्या. त्यांच्या ह्या कारकीर्दीला मानाचा मुजरा…. अशा या अनाथांच्या माईला स्मृतीदिना निमित्त भावपूर्ण आदरांजली..!
- श्री.विश्वनाथ दादा कोरडे (सदस्य-प्रदेश कार्यकारणी महाराष्ट्र भाजपा)
Discussion about this post