प्रतिनिधी:- गणेश धनवडे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब वालचंदनगर ता. इंदापूर जि. पुणे अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा, लिंगभाव आणि संवेदनीकरण या विषयावर आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. सुवर्णा बनसोडे यांनी केले. त्यामध्ये त्यांनी कार्यशाळेचा उद्देश आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला.
या कार्यशाळेचे उद्घाटन इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव- वीरसिंह रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय केसकर, उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग, प्रमुख वक्ते समीक्षा संध्या मिलिंद, कार्यक्रम अधिकारी राजेंद्रकुमार डांगे व सुवर्णा बनसोडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. वीरसिंह रणसिंग यांनी विद्यार्थ्यांना लिंगभाव समानता, लिंगभाव आणि कायदेशीर माहिती या विषयावर कार्यशाळा का घ्यावी लागते. याबद्दल आपण विचार करायला हवा सामाजिक परिस्थिती बदलत आहे. आपण संवेदनशील झाले पाहिजे. त्याचबरोबर समाजाची जाण आणि भान आपल्याला असले पाहिजे असे मार्गदर्शन केले.
प्रथम सत्र- समीक्षा सध्या मिलिंद यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी लिंगभाव आणि कृतिशीलता याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अनेक उदाहरणांचा दाखला देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या विषयाची सांगड घालून दिली. दुसऱ्या सत्रामध्ये ॲडव्होकेट- अनघा रणवरे यांनी लिंगभाव आणि कायदेविषयक माहिती याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये पोक्सो कायदा असेल तसेच गुन्हेगारीचे कायदे असतील याविषयी मार्गदर्शन केले. उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग यांनी सावित्रीमाई फुले आणि महात्मा फुले या दांपत्याविषयी त्यांचे जीवन कार्य चरित्र विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. विजय केसकर यांनी केला. यावेळी बोलत असताना त्यांनी सामाजिक परिस्थिती आणि आजचे वास्तव याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी भिगवण,इंदापूर, सराटी, बावडा, भवानीनगर, बारामती, शारदानगर, माळेगाव, सोमेश्वरनगर, दौंड इत्यादी महाविद्यालयांमधून एकूण 28 प्राध्यापक आणि 126 विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते. संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग आणि प्राचार्य, डॉ. विजय केसकर यांच्या मार्गदर्शननाखाली कार्यशाळा यशस्वी संपन्न झाली. समिती सदस्य प्राध्यापक डॉ. अमर वाघमोडे,प्रा. तेजश्री जाधव, प्रा. नितीन गोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यशाळेचे सूत्रसंचलन प्रा.कपिल कांबळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.रवी गायकवाड आणि प्रा.सचिन आरडे यांनी करून दिला. आभार प्रा.राजेंद्रकुमार डांगे यांनी मानले.


Discussion about this post