प्रतिनिधी:- ज्ञानेश्वर सावळे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगरविकास विभाग आणि एमएमआरडीएच्या बैठकीसाठी उपस्थित होतो. राज्यातील जनतेने महायुती सरकारला जे प्रचंड बहुमत दिले आहे, जनतेने जी पोचपावती दिली आहे त्याची परतफेड करण्यासाठी आम्ही १०० दिवसांचे व्हिजन ठरवले आहे. आज झालेल्या आढावा बैठकीत लोकाभिमुख योजनांच्या अमलबजावणीबाबत चर्चा झाली. नगरविकास विकास विभागाच्या आढावा बैठकीत राज्यातील शहरांचे जे विकास आराखडे (डीपी) प्रलंबित आहेत त्यावर तातडीने निर्णय घेण्याबाबत चर्चा झाली. एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे बोरिवली बोगद्याच्या कामाला लवकरच सुरुवात करून हा प्रकल्प मार्गी लावण्याबाबत चर्चा झाली. बीकेसीमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या पॉड टॅक्सी बाबतही सविस्तर आढावा घेण्यात आला. मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावर होणारी वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनेवरही या बैठकीत चर्चा झाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.
Discussion about this post