अकोला प्रतिनिधि गणेश वाडेकर
04/01/2025
बार्शीटाकळी येथे एका बंद पडलेल्या जिनिंग प्रेसिंग मध्ये सुरू असलेल्या ड्रग्जच्या फॅक्टरीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून तब्बल २ कोटी ३८ लाख ७० हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. यातील फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यात अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून आरोपी इमरान खान असलम खान वय ४२ वर्ष, रा. सुरत याला शेगाव येथून अटक करण्यात आली आहे. बार्शीटाकळी येथील एका बंद पडलेल्या जिनिंग प्रेसिंगमध्ये ड्रग्जच्या कारखान्यावर धाड टाकली होती.
Discussion about this post