
प्रशांत टेके पाटील / कोपरगाव –
दि ६ जानेवारी २०२५ रोजी कोपरगाव येथील पत्रकारांचा यथोचित सन्मान व सत्कार आयोजित करण्यात आला होता. पत्रकार दिन समारंभ शुभारंभ दिप प्रज्वलन करून व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि सहकार महर्षि शंकररावजी कोल्हे यांच्या प्रतिमा पुजनाने झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी साहेब, अमितदादा कोल्हे , विवेकभैय्या कोल्हे,उद्योगपती अग्रवाल, अत्रे साहेब, विवेक कोल्हे यांनी सांगितले की, पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने गांभीर्याने विचार करावा.तसेच पत्रकारांसाठी लाडकी बहिण योजनेसारखी पत्रकार मानधन योजना सुरू करण्याचे आवाहन शासनाला केले आहे. पत्रकारांनी सुद्धा तालुक्यातील नेत्यांना एका व्यासपीठावर एकत्र करून सर्वसामान्य माणसाला व तालुकाला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत. अध्यक्ष यदू जोशी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पत्रकारांची आर्थिक परिस्थिती अतिशय खालावलेली कायमच असते. आई टीबीने वारल्यानंतर अठरापगड जातीच्या लोकांच्या आधारावर जगलो.मेहनतीवर जगतो आणि खातो. महाराष्ट्र राज्यात काळाची गरज म्हणून पत्रकाराना विरोधीपक्ष नेता व्हावे लागेल.ए आय टिकवावी लागेल.पत्रकारानी विश्वासाहर्ता टिकवावी लागेल.आपली विश्वासाहर्ता आपल्या वागण्यात पण असलीच पाहिजे.पत्रकार २४ तास पत्रकाराता करणारा असावा.नेत्याकडून जर मेहरबानी घेत असतील तर तुमचे कोणतेही काम होऊ शकत नाही.कोल्हे परीवाराने स्किल डेव्हलपमेंट कामाची सुरुवात करावी. ग्रामपंचायत पासून आमदार खासदार पर्यंत सर्वांना प्रशिक्षण देऊ शकेल असे सेंटर उभे करावेत. प्राकटीकल जर्नालिझम राष्ट्रव्यापी संस्था उभी करावी.सरकारच्या विरोधात बातम्या लिहावे लागेल . पत्रकारीता करताना समोरच्या मुका मार द्या पण रक्तबंबाळ करू नका. पत्रकारांनी राजकारण हे राजकारणाच्या चष्म्यातून पाहा व लिखाण करा असे आवाहन पत्रकारांना केले. सुत्रसंचालन प्रा. दवंगे यांनी केले..
Discussion about this post