दापोली डेपो मधुन सकाळी 8: 00 वा. येनारी आडी कोळथरे एस.टी .बस आणि दुपारी 3:00 वा.येनारी एस टी.बस दोन वेळेस येणारी एस टी बस येत नसल्याने प्रवाशांना व शाळेय विद्यार्थी यांची गैर सोय होत असल्याने यांना खुप त्रास सहन करावा लागत आहे
दापोली मधुन आडी कोळथरे हि एस.टी बस सकाळ व दुपारी अशी दोन वेळेस चालु असनारी बस सेवा एक दिवस पाठवली जाते तर कधी कधी दोन दिवस नाही पाठवली जात तसेच कधी सकाळी बस येते तर कधी दुपारी नाही हे आज खुप महिणे घडतंय आणि आज हि ते चालु आहे असे अनेक प्रवासी या़ंच म्हणणं आहे.
दापोली एस.टी बस डेपोमध्ये खुप वेळा प्रवाशांनी गैर सोई बद्दल भेटुन सविस्तर सांगुन सुद्धा आज हि आडी कोळथरे एस.टी बस. सेवा अशाच प्रकारे चालू आहे.
एस .टी बस नेहेमी चालु नसल्याने व कधी आली तर ती टायमात नसल्याने शाळेत विद्यार्थी,तसेच प्रवाशी यांना ईतर कोणती हि बस साधनं नसल्याने बोरिवली आडी , व चिखलगाव ,या प्रवाशांना पाई प्रवास कराव लागतोय.
दररोजच्या अशा पाई प्रवास आणि विद्यार्थी, मुलांना शाळेत जाण्यासाठी पाई प्रवास कराव लागतोय अशा गैरसोय होत असल्याने प्रवाशांन कडुन नाराजी व्यक्त होत असल्याचं दिसुन येतय.
दापोली डेपो,तसेच प्रशासनाने या गैरसोय बदल गांभीर्याने लक्ष देणे गरजेच आहे .
Discussion about this post