प्रतिनिधी:- सुशील पवार
वनवासी विकास मंडळ वघई संचलित नव चेतन हायस्कूल झावडा येथील विद्यार्थ्यांसाठी
वांझटजआंबा येथील पारधे डुंगरजवळ वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.या वनभोजनात विद्यार्थ्यांना वनभोजनाचा आस्वाद घेताना गावातील वनस्पती, नदीची ओळख करून देण्यात आली. ज्यामध्ये मुलांनी खूप मजा केली. जेवणात डाळ-भात, भाजी, मोहनथाळ, कोशिंबीर, ड्रायफ्रूट आईस्क्रीमचा आस्वाद घेतला. शाळेतील शिक्षक, वसतिगृह कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी वन भोजनास उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.
Discussion about this post