उदगीर/कमलाकर मुळे :
उदगीरचे आराध्य दैवत श्रीगुरु हावगीस्वामी याञा महोत्सव समितीच्या वतीने श्रीगुरू हावगीस्वामी मठात राष्ट्रसंत डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ते१५ जानेवारी दरम्यान अखंड शि वनाम सप्ताह ,सप्तकोटी शिवपंचाक्षर महामंञ जपयज्ञ व परमरहस्य ग्रंथाचे पारायण सुरू झाले.
वीरशैव शिवकीर्तनकार मंडळाचे अध्यक्ष शि.भ.प.शिवराजअप्पा नावंदे गुरूजी व शि.भ.प.तानाजी पाटील थोटवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्तन व प्रवचन सोहळा सुरू झाला आहे.१०रोजी शि.भ.प.ञ्यबंक स्वामी नांदगावकर , ११ रोजी संगमेश्वर बिरादार वलांडी,१२ रोजी रजनीताई मंगलगे गंगाखेड,१३ रोजी उध्दव महाराज हैबतपुरे,१४ रोजी टाळ आरतीचे कीर्तन अशोक बिरादार वडगाव तर राञी ९ ते १२ शिवराजअप्पा नावंदे गुरूजी यांचे कीर्तन होईल.बुधवारी सकाळी १०.३० वाजता श्री.प.ब्र.१०८ सिद्धदयाल शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांचे महाप्रसादाचे कीर्तन होणार आहे.तर दिवसभर कुस्त्यांचा कार्यक्रम होणार आहे.१४ रोजी परमरहस्य ग्रंथ व सप्तकोटी शिवपंचाक्षर महामंञ जपाची सांगता होणार आहे.सकाळी ११ वाजता शोभायात्रा निघून ३ वाजता आरती होणार आहे.तर राञी २ वाजता पालखी मिरवणूक निघून १५ जानेवारी रोजी पहाटे अग्गीचा कार्यक्रम होणार आहे.उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे..
Discussion about this post