
रांजणगाव गणपती प्रतिनिधी : बाळासाहेब कुंभार..
पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध मोरांचे गाव,मोराची चिंचोलीयेथील युवा उद्योजक, महाराज ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कुमार महाराज नाणेकर यांच्या वतीने दिनदर्शिका २०२५ प्रकाशन सोहळा चिंचोली येथे पार पडला.
“दिनदर्शिका २०२५” चे प्रकाशन शरदचंद्रजी पवार गटाचे नेते श्री. देवदत्त निकम साहेब व भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री.संतोष दादा भरणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
महाराज ग्रुप नेहमीच सांस्कृतिक, धार्मिक,शैक्षणिक ,सामाजिक उपक्रम राबवत असतात महाराज ग्रुप चे अध्यक्ष यांनी नववर्षाची सुरुवात आपल्या संकल्पनेतील पं. सं .गणातील प्रत्येक गावातील ग्रामदेवतेच्या प्रतीमेसह “दिनदर्शिका २०२५” प्रकाशित केली आहे व दिनदर्शिका आपल्या कारेगाव पंचायत समिती गणातील हक्काच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीही योग्य नियोजन केले असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले..
Discussion about this post