मारेगाव :बौद्ध विहार सगनापुर येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन व सावित्रीबाई फुले जयंती असा संयुक्त कार्यक्रम 5 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दादाराव जी वानखेडे यांनी धुरा सांभाळली
प्रमुख मार्गदर्शक
आयु .विलास नरांजे सर
आयु .संजय तेलंग सर
यांनी एक जानेवारी 1818 मध्ये झालेल्या लढाईचा इतिहास सांगून समाजाला मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला चिकाटे सर (मुख्याध्यापक सगनापूर) ,
रेखाताई जीवने (माजी अध्यक्ष महिला कमिटी )
तसेच उज्वलाताई वानखेडे (माजी सचिव महिला कमिटी)
मार्शल .आयु प्रकाश ताकसांडे सर
मार्शल .आयु विजय कांबळे सर
मार्शल .आयु सातपुते सर
मार्शल .आयु गौतम तोतडे सर हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले कार्यक्रमाची प्रास्तावना आयु. वैभव वेले यांनी केली कार्यक्रमाचे संचालन आयु .संदीप जीवने यांनी केले तर कार्यक्रमाला लाभलेले सर्व प्रमुख मार्गदर्शक प्रमुख अतिथी गावकरी सर्व आयोजक व कार्यक्रमाचे आभार आयु राहुल वानखेडे यांनी केले
या कार्यक्रमाला समता सैनिक दल मारेगाव युनिटचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post