खोपोली / मानसी कांबळे :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार तानाजी कांबळे सर्वसामान्य नागरिकांसाठी सदैव तैयार असतात. अन्यायग्रस्त…अत्याचारग्रस्त…पिडीत ग्रस्त लोकांसाठी तुषार कांबळे नेहमीच विविध माध्यमातून लढा उभारत असतात. आताही कोयना प्रकल्पग्रस्तांसाठी तुषार कांबळे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद (आबा) पाटील यांची भेट घेवून त्यांच्या व्यथा मांडणार आहेत.
कोयना धरण बांधताना कोयना परिसरातील रहिवासी यांची महाराष्ट्र शासनाने जागा हस्तांतरीत करून कोयना धरण बांधले. परंतु संबंधित काही शेतकरी व नागरीक यांना ‘त्या’ जागेच्या बदल्यात शासकीय नियमाप्रमाणे पर्यायी जागा देणे होते व आर्थिक मदत करणे होते. मात्र, आज अनेक वर्ष झाले असता सुद्धा संबंधित शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. याकरीता सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार तानाजी कांबळे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद (आबा) पाटील यांना भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान मंत्री महोदय यांना निवेदनाद्वारे संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार, असे तुषार कांबळे यांनी म्हटले आहे.
Discussion about this post