नूतन माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने शाळेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 स्कूल कनेक्ट 2.0 याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सोनगीर येथील बहुजन समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.अरविंद.बी.पाटील प्रा.डॉ.नरेंद्र सोनवणे व प्रा.डॉ.रविंद धिवरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या धोरणासंदर्भात विद्यार्थ्यांना परिपूर्ण असे मार्गदर्शन करण्यात आले.
या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा बद्दल मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.नरेंद्र सोनवणे यांनी रोजगारभिमुख शिक्षण व पाठ्यक्रमातील लवचिकता याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच प्रा.डॉ.रविंद धिवरे यांनी शिक्षणासाठी लागणाऱ्या आर्थिक सहायता कोणकोणत्या योजना आहेत याबद्दल विद्यार्थ्यांना सांगितले तसेच या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत सरकारद्वारे विविध कौशल्य केंद्रित उपक्रम राबवणार आहेत याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे वेळी बुके ऐवजी पुस्तक याअंतर्गत कला वाणिज्य महाविद्यालय सोनगीर चे प्राचार्य डॉ.अरविंद.बी.पाटील व प्रा.डॉ.नरेंद्र सोनवणे व प्रा.डॉ.रवींद्र धिवरे यांचा साऊ हे पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक डी.पी.माळी,
शिक्षक एस.पी.एंडाईत,ए.डी.पाटील,बी.ए.माळी,एस.सी.महाजन,व्ही.डी.शिरसाठ,के.एल.ठाकरे,पी.सी.धनगर,व्ही.आर.
माळी,डी.डी.सोनवणे,जी.एस.कुवर, महेंद्र मनोहर माळी,तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Discussion about this post