सोनगीर प्रतिनिधी
बाभळे येथील ओ.एम. रुपनर माध्यमिक विद्यालय बाभळे ता शिंदखेडा जि धुळे येथे इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थिनींचा आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला.
आनंद मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे संचालक श्री.विकास रुपनर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. विद्यार्थिनींना ʻ कमवा व शिका ʼ याची जाणीव होण्यासह विविध व्यवसाय व व्यवहाराची माहिती व्हावी, यासाठी हा आनंद मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात मुलींना व्यवहार ज्ञान, नफा- तोटा, फायदा- नुकसान व हिशोबाचा ताळमेळ हे कौशल्य या मेळाव्यातून शिकण्यास मिळाले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.भटू राजे व सर्व शिक्षक, शिक्षिका, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. आनंद मेळाव्यात विद्यार्थिनींनी पाणीपुरी, भेळ, गुलाब जामुन, आप्पे, इडली, मसाला पापड, मूग भजी, पास्ता, खमण, पोंगे बटाटे, दही वडा, चणा भेळ मठ्ठा या विविध खाद्यपदार्थांचे एकूण ३५ स्टॉल लावले होते.
आनंद मेळाव्याचे प्रोजेक्ट हेड म्हणून उषा माळी,सोनल सैंदाणे रूपाली पाटील यांनी काम पाहिले.
मेळाव्याच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर बंधुंनी परिश्रम घेतले. यावेळी सर्व विद्यार्थिनींनी उपस्थित राहून मेळाव्याचा आनंद लुटला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल साळुंके यांनी केले तर उषा माळी यांनी आभार मानले
Discussion about this post