कला, संस्कृती आणि परंपरा यांचा त्रिवेणी संगम म्हणजे टिटवाळा महोत्सव – विजय देशेकर
टिटवाळा (कल्याण ) : प्रफुल्ल शेवाळे
कला,संस्कृती व परंपरा जोपासण्यासाठी संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने ५ ते १५ जानेवारीदरम्यान ठाणे जिल्ह्यातील टिटवाळामध्ये टिटवाळा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आजपर्यंत लाखो नागरिकांनी या टिटवाळा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाआहे.
या महोत्सवाला टिटवाळ्यासह आसपासच्या ग्रामीण भागातीलl लाखो नागरिकांनी आजतगायत या महोत्सव मध्ये उपस्थिती दर्षविली आहे . या महोत्सवात महिला बचत गटांनी घरी तयार केलेल्या विविध वस्तू, तसेच खाद्यपदार्थ, खाऊगल्ली, लहान-मोठ्यांसाठी खुला रंगमंच उपलब्ध करण्यात आलेला आहे . तसेच फन झोनमधील आकाश पाळणा, लहान मुलांसाठी टॉय ट्रेन, हवेच्या दाबावरील राक्षस असे विविध खेळसुद्धा या महोत्सवाचे आकर्षण ठरले आहेत . भिवंडी लोकसभा खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी नुकतीच या महोत्सव मध्ये भेट दिली आणि टिटवाळा महोत्सव च्या माध्यमातून कलेचा सांस्कृतिक वारसा जपण्याचं काम होत आहे असा या महोत्सवास आपल्या मनापासून शुभेच्छा आहेत असं खा. बाळ्यामामा यांनी म्हटले आहे.या महोत्सवास संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, मुरबाड आदी भागातून अनेक , राजकीय, सामाजिक, वकील, पत्रकार, समाजसेवक अशा विविध भागातील मान्यवर उपस्थिती दर्शवीत असतात. टिटवाळा आणि परिसरातील विविध शाळामधील अनेक बालकलाकार विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांनी आपली नृत्य सादर केली आहेत आणि करत आहेत .. जुन्या नवीन गाण्यांवर या कलाकारांची पाऊले थीबकताना दिसत
आहेत .
तब्ब्ल दहा दिवस सुरू असलेल्या महोत्सवात लकी महिलांसाठी भव्य पाककला, सुगरण स्पर्धा, असे कार्यक्रम करत बक्षिसांची अक्षरशः लयलूट करण्यात आली आहे.. या टिटवाळा महोत्सवाच्या माध्यमातून टिटवाळा परिसरातील आरोग्य सेवेकरिता रुग्णवहीका लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी टिटवाळा महोत्सव चे संस्थापक आणि कल्याण तालुका शिवसेना उपशहर प्रमुख विजय देशेकर यांनी दिली आहे. कला, संस्कृती आणि परंपरा यांचा त्रिवेणी संगम म्हणजे टिटवाळा महोत्सव आहे असं म्हटलं तर ते नक्कीच लागू पडेल अशा भावना विजय देशेकर यांनी व्यक्त केल्या आहेत.
Discussion about this post