स्री शिक्षणाची देवता सावित्रीबाई फुले
स्त्रियांच्या शिक्षणाची सावित्री तूच
खरी कैवारी
तुझ्याचमुळे शिकत आहे आज
प्रत्येक नारी
वरील वाक्यानुसार ज्या काळी स्त्रियांना फक्त चुल व मूल सांभाळणे हे स्त्रियांचे काम होते त्या काळात स्त्रियांना शिक्षण देण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केलं ज्याकाळी स्त्रियांवर अन्याय होत होता पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना गुलामगिरीने वागविल जात होतं त्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांबरोबर स्त्रियांनाही मानाचे स्थान मिळाले पाहिजे याची जाणीव करून देण्यासाठी स्त्रियांना शिक्षणाची आवश्यकता होती म्हणून सावित्रीबाई फुले यांनी स्री शिक्षणाची गरज सांगितली.
एक आदर्श शिक्षिका,प्रथम मुख्याध्यापिका समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे झाला खंडोजी नेवसे पाटील आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला.लहानपणापासूनच सावित्रीबाई फुले जिद्दी,धाडसी,स्वाभिमानी होते. सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या 9 व्या वर्षी झाला. सावित्रीबाई फुले यांचा विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबरोबर 1840 मध्ये विवाह झाला. त्यानंतर सावित्रीबाईंचे खरे शिक्षण सुरू झाले. सावित्रीबाई शिक्षणात रमत गेल्या त्यांना शिक्षणात खूप आवड होती ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी ते ओळखले म्हणून ज्योतिरावांनी सावित्रीबाईला शिक्षित केले गुणवत्ता निर्माण केली आणि 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा सुरू केली.
स्री शिक्षण म्हणजे समाजविरोधी कार्य समजले जात होते अशा प्रतिकूल बिकट परिस्थितीत सावित्रीबाईंनी महात्मा ज्योतिबांच्या भक्कम पाठिंब्याने पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली आणि महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण राष्ट्रात स्री शिक्षणाचा पाया त्यांनी रोवला
समाजातील सर्व लोकांचा विरोध असताना स्वतः अगोदर शिक्षण घेतल व शिक्षिका, मुख्याध्यापक म्हणून मुलींना शिक्षण देण्याचे पवित्र असे कार्य त्यांनी केलं कारण शिक्षणाची गरज सावित्रीबाईंनी ओळखली होती. मुलींची पहिली शाळा जेव्हा सुरू केली तेव्हा शिक्षणाचे महान कार्य करणे एवढं सोपं नव्हतं कारण तेव्हा सावित्रीबाईंना लोकांकडून खूप त्रास झाला. काही लोक म्हणायचे धर्म बुडाला,संस्कृती विटाळली,काही लोकांनी सावित्रीबाई फुले यांना अंडी मारले, कोणी चिखल, माती अंगावर फेकली, कुणी वाट अडवली. या सर्वांच्या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करून सावित्रीबाईंनी आपले स्री शिकली पाहिजे हे एकच ध्येय ठेवून शिकवण्याचे काम चालू ठेवले.
सावित्रीबाई फुले यांना स्त्रियांना शिक्षण देण्याबरोबरच त्यांना असे वाटू लागले की शिक्षणाबरोबर समाजात शिक्षणाचा प्रसार, प्रचार करावा लागेल.शिक्षणाबरोबर सामाजिक क्षेत्रातही काम करावे लागेल म्हणून सावित्रीबाई फुले यांनी विधवा विवाह, स्रीयांचे अधिकार, विधवांचे केशवपण,हुंडाबंदी,बालविवाह इत्यादी महिलांच्या समस्या वर संघर्ष केला त्यांनी अनेक सामाजिक कार्य केलं समाजातील लोकांना खूप मदत केली. 1868 ची गोष्ट अस्पृश्यता समाजात खूप होती पुणे येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नव्हते. पाणी म्हणजे जीवन सर्वांना आवश्यक असणारा घटक म्हणजे पाणी एवढी भीषण टंचाई असताना त्यांनी आपल्या वाड्यातील हौद पाणी पिण्यासाठी लोकांना खुला करून दिला आणि सर्वांना पाणी मिळाले.अशा अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग असेल सावित्रीबाई ह्या केवळ शिक्षिका न होत्या ते कवित्री,लेखक विविध विषयावरती कविता व लेखणीच्या माध्यमातून समाज जागृती व शिक्षणाचा प्रचार करत असे.
काव्यफुले व बावनकशी संबोध,रत्नाकर हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले.
सावित्रीबाई शिक्षणासंबंधी म्हणतात शुद्राना सांगण्यायोगा शिक्षण मार्ग हा शिक्षणाचे मनुष्य बळ प्रशुत्व हाटते पहा सावित्रीबाई फुले यांना या शिक्षण कार्यात अनेक अडचणी आल्या.त्या सर्व अडचणीवर मात करत ते 1848 ते 1852 या काळात 18 शाळा त्यांनी सुरू केल्या व ज्ञानदानाचे काम हे चालू ठेवले. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.सावित्रीबाई फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या कार्यांमध्ये त्यांचा सहभाग असे त्यांनी अनेक सामाजिक चळवळीमध्ये भाग घेतला. महात्मा ज्योतिराव फुले यांचे निधन 28 नोव्हेंबर 1890 मध्ये झाले व त्यानंतर सत्यशोधक समाजाचे सर्व कार्याची जबाबदारी सावित्रीबाई फुले यांच्यावर आली.व सासवड येथे झालेल्या सत्यशोधक समाजाच्या परिषदेत सावित्रीबाई फुले यांनी अध्यक्ष पद भूषवले होते.
सण 1896 मध्ये पुणे परिसरातील प्लेग या साथीच्या रोगाने थैमान घातले होते. प्लेग हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे तो लवकर त्यांच्यावर उपाययोजना करावी म्हणून सावित्रीबाई फुले यांनी म्हणून त्यांनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ रोगांना आधार देण्यासाठी त्यांनी दवाखाना सुरू केला व ते प्लेग पिढी त्यांना भेटू लागले त्यांची सेवा करत असताना सावित्रीबाई फुले यांना प्लेग या रोगाची लागण झाली आणि 10 मार्च 1897 प्लेग या आजाराने सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू झाला.
सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण क्षेत्रात दगड गोट्यांचा मार सहन करून शिक्षण सुरू केले होते सामाजिक कार्य त्यांचा नेहमी पुढाकार असायचा. त्या नेहमी स्री शिक्षणाच्या प्रसार व समाजातील लोकांना जवळ घेऊन सल्ला घ्यायचे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महान शिक्षणची खरी देवता होय 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवस असतो म्हणून या दिवशी बालिका दिन म्हणून आपण साजरा करत असतो.
या महान समाजसेविका प्रथम,शिक्षिका,मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम.
नाव – पुरुषोत्तम चिंतामण धनगर
मा.शिक्षक
नूतन माध्यमिक विद्यालय कापडणे ता.जी.धुळे
Discussion about this post