घनसावंगी: मॉडेल कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागांच्या वतीने विशेष सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरांचे आयोजन आवलगाव येथे करण्यात आले असुन या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून स्वच्छता अभियान, बालविवाह जनजागृती, रक्तदान शिबीर, स्वच्छ खेडे, पाणी आडवा पाणी जिरवा अभियान,व एन.एस. एस. च्या स्वयंसेवकांच्या श्रमदानातून १५ लाख लिटर क्षमतेचे वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली आहे. या मुळे आवलगाव येथील पाणी पुरवठा विहीर व तेथील परिसरातील शेतकऱ्यांना या बंधाऱ्याचा मोठा फायदा होणार आहे. या विशेष श्रम संस्कार शिबिरात सकाळच्या सत्रात श्रमदान व दुपारच्या बौद्धिक क्षेत्रात विविध मौलिक विषयांवर व्याख्यानाचे चे आयोजन करण्यात आले असुन व संध्याकाळी सांस्कृतिक क्षेत्रात विविध कला गुण व त्या माध्यमातून लोकात जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात येतात यासाठी सर्व एनएसएसचे स्ववसेवक विद्यार्थी प्रचंड मेहनत घेत असून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्राचार्य डॉ. रामरावजी चव्हाण सर कार्यक्रमाधिकारी प्रा. नउखंडे सर प्रा. गोरे सर .प्रा. खोजे सर व विद्यार्थी प्रतिनिधी राहुल शिंदे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनाचे सल्लागार टिम हे या श्रमसंस्कार शिबिरात यशस्वी करण्यासाठी सर्व सेवकांना मार्गदर्शन करत आहे
Discussion about this post