हिमायतनगर (प्रतिनिधी लक्ष्मण शेन्नेवाड)
दिनांक 13 जानेवारी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोळीकर यांच्या अध्यक्षेतेखाली जनता दरबार व पाणीपुरवठा आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.या बैठकीस जनतेकडुन प्रश्नाचा डोंगर उभा करण्यात आला.यावेळी आमदार कोळीकर यांनी संबधित प्रशासनाच्या अधिकार्यांना सक्त सुचना दिल्यात आजपर्यत जो त्रास नागरिकांना झाला तो यापुढे होता कामा नये तालुक्यातील गुटखा,मटका अवैध दारू,रेती तस्करी हे पुर्ण पणे झाले पाहिजेते यामुळे अनेकांचे कुटुब उघड्यावर येत असुन अवैध धंदे चालवणारे राजरोस पणे वावरताना दिसत आहेत शेतकर्यात्या संर्दभात अनेक सिंचन कामे थोड्याच दिवसात मार्गी लागतील शिक्षण विभागातील शिक्षकाची संख्या कमी असल्यामुळे एकाच शिक्षकांना अनेक कामे पार पाडावी लागत त्यामुळे विध्यार्थ्याच नुकसोन होत त्यासंदर्भात सुद्धा पाठपुरावा करून शिक्षकांची संख्या वाढवणे आहे तहसिल व पंचायत समिती प्रशासनासनाने कुठल्याही कामात शेतकरी व जनतेची अडचण होणार नाही त्यांना सर्व सुविधेचा लाभ मिळवता आला पाहिजेत असे कार्य करण्याच्या सुचना आमदार कोळीकर यांनी दिल्या.यावेळी नांदेड जिल्हा परिषद माजी सभापती प्रतापराव देशमुख सरसमकर,शिवसेना जिल्हा प्रमुख विवेक देशमुख,जिल्हा उपाध्यक्ष राजु पाटील भोयर,युवाजिल्हा सेना प्रमुख संदेश पाटील ,तहसिलदार पल्लवी टेभकर,गटविकास अधिकारी जाधव ,विकास पाटील देवसरकर,माजी उपनगरध्यक्ष जावेद भाई यासह असंख्य कार्यकर्ते अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते
Discussion about this post