प्रवीण इंगळे— उमरखेड तालुका प्रतिनिधी मो 7798767266
उमरखेड–दि 12 जानेवारी 2025ला राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ साहेब तसेच स्वामी विवेकानंद जयंती दिन आणि पोलीस रेझिंग डे निमित्त पोलीस स्टेशन उमरखेड येथे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य महा रक्तदान संपन्न झाले.
अहोरात्र जनतेची सेवा करत असणाऱ्या पोलीस बांधवांच्या पोलीस रेझिंग डे निमित्त सततच उमरखेड येथील प्रत्येक परिस्थिती मग श्री गणपती विसर्जन असो किंवा दुर्गामाता विसर्जन असो ईद-ए-मिलाद असो इत्यादी सर्व सामाजिक सण शांततेत व्यवस्थित पार पाडण्या करिता समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन समाजस्थाने पार पाडण्याचे कार्य पोलीस अधीक्षक कुमार चिंता, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांचे मार्गदर्शन खाली उमरखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार शंकर पांचाळ हे आपल्या अधिनस्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सहकार्याने सतत करत असतात.
प्रत्येक समाज व त्या त्या समाजातील घटक एकरूप व्हावा शांततेने जीवन व्यतीत करून सामाजिक सलोखा साधता यावा.
या उद्देशाने आज पोलीस स्टेशन उमरखेड येथे भव्य महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले

Discussion about this post