तालुक्यातील पाटोळे येथील किरण महाराज पगारे यांनी 1 जानेवारी 12 जानेवारी युवा सप्ताह म्हणून तालुक्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेत जाऊन स्वामी विवेकानंद विचार पोहोचवण्याचे कार्य या वर्षी सुरु केलं होतं त्याचा समारोप म्हणून नांदुर शिंगोटे येथील तरुणांनी एकत्र करून स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्याचा मानस त्यांनी केला आणि त्या कार्यक्रमासाठी गावातील तरुण ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच उपस्थित होते आजचा तरुण कसा असावा आणि समाजकारण, वाचन संस्कृती ,या विविध विषयावर त्यांनी योग्य मार्गदर्शन करून तरुणांची मन जिंकली त्यातच एक ऊर्जा म्हणून प्रेरणा म्हणून त्यांना युवा मित्र म्हणून गौरवण्यात आलं त्यावेळी नांदूर शिंगोटे गावचे सरपंच दीपक बर्के उपसरपंच राजेंद्र दराडे सदस्य दिलीप शेळके तुकाराम मेंगाळ, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आधी इतर संस्थांचे पदाधिकारी व तरुण वर्ग उपस्थित होते.
Discussion about this post