बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस आणि राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने कराड तालुक्यातील संघर्षमय प्रवास करणाऱ्या पत्रकाराची म्हणजेच पाडळी (केसे), तालुका कराड, जिल्हा सातारा गावचे सुपुत्र आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष,डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष दैनिक क्रांतिकारी जयभीमचे संपादक, तिरंगा रक्षक चे मुख्य संपादक तथा राजकीय बादशाह या सांजदैनिकाचे कार्यकारी संपादक विश्वास बाबुराव मोहिते यांच्या पत्रकारितेतील संघर्षमय जीवनातील काही प्रसंग आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने…..
पाडळी (केसे), तालुका कराड, जिल्हा सातारा गावचे सुपुत्र आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष,दैनिक क्रांतिकारी जयभीमचे संपादक, तिरंगा रक्षक चे मुख्य संपादक तथा राजकीय बादशाह या सांजदैनिकाचे कार्यकारी संपादक विश्वास बाबुराव मोहिते यांनी आपल्या पत्रकारितेला सातारा जिल्ह्यातील एका स्थानिक दैनिकातून सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये ते राहत असलेल्या पाडळी(केसे) गावातील आणि या विभागातील गावांसाठी विजयनगर बातमीदार म्हणून कामकाजाला सुरुवात केली.
सुरुवातीच्या काळात केवळ बातमी आणि कार्यक्रमांचा वार्तांकन एवढीच बातमीदारी सुरुवातीच्या काळात सुरू केली. पत्रकारितेला सुरुवात केल्यानंतर विविध भागातील समस्या आणि आली अडचणी लोक त्यांच्याजवळ सांगू लागले आणि त्याचे पुरावे वगैरे सादर करू लागले. या पुराव्याच्या आधारे आणि प्रत्यक्ष परिस्थिती पाहून विश्वास मोहिते यांनी सुरुवातीच्या काळामध्ये या विभागातील समस्या आपल्या शब्दांमध्ये मांडून अन्याय विरुद्ध आवाज उठवण्यास सुरुवात केली आणि सर्वसामान्य नागरिकांच्या व्यथा या शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम करू लागले.
दिन, दलित, पददलीत,वंचित, युवक आणि निराधार यांच्या समस्या या विभागातील असणाऱ्या अडीअडचणी निर्भीडपणे मांडण्यास सुरुवात केली. या पत्रकारितेच्या माध्यमातून काम करीत असताना या विभागातील लोकांच्या मनातील ताईत बनू लागले. विश्वास मोहिते आपल्या लेखणीच्या माध्यमातून विजयनगर सुपने परिसरातील गावांबरोबर ते कराड तालुक्यामधील लोकांच्या जवळचे पत्रकार बनू लागले. नागरिकांच्या समस्या, अधिकारी कर्मचाऱ्यांकडून होत असलेली नागरिकांची अडवणूक आणि पिळवणूक याविषयी विश्वास मोहिते निर्भीडपणे आपली मते मांडू लागले.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात त्यांच्याबद्दल एक आदर आणि एक आशा निर्माण झाली. परंतु मात्र काम चुकार अधिकारी कर्मचारी यांच्या मात्र मनात त्यांच्याबद्दल धास्ती निर्माण होऊ लागली. विश्वास मोहिते यांच्या लेखणीची जसजशी तीव्रता वाढू लागली. त्याच ताकदीने त्यांच्याबद्दल त्यावेळी कार्यरत असणाऱ्या वर्तमानपत्रातील व्यवस्थापन यांच्यामध्ये नकळत मतभेद होऊ लागले.
वृत्तपत्र व्यवस्थापन आणि विश्वास मोहिते यांच्यातील मतभेद सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यात कुठेतरी कमी पडू लागला आहोत अशी मानसिकता विश्वास मोहिते यांची सन 2008 च्या दरम्यान झाली. त्यासाठी आपण इतर वर्तमानपत्रात लिहिलंच पाहिजे परंतु आपले स्वतःचं विचार फिट असलं पाहिजे या मानसिक ते पर्यंत विश्वास मोहिते 2009 च्या दरम्यान पोहोचले.
आपल्या लेखणीची तीव्रता कुठेतरी होऊ नये यासाठी आपले स्वतःचे हक्काचे विचारपीठ किंवा व्यासपीठ असणे गरजेचे आहे हे ओळखून 2009 साली विश्वास मोहिते यांनी स्वतःचे तिरंगा रक्षक नावाचे साप्ताहिक प्रसिद्ध करण्यास सुरू केले.
या साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी विविध विषयांवरती परखडपणे लिखाण सुरू केले. तिरंगा रक्षक च्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या व्यथा राज्य शासनापर्यंत आणि राज्य शासनाच्या योजना सुविधा या वाचकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले होते. अशा निर्भिड आणि वास्तववादी लिखाणामुळे विश्वास मोहिते यांना काही लोकांचा आणि काही समाजकंटकांचा काही अधिकाऱ्यांचा रोष ओढाऊन घ्यावा लागला. तरीही विश्वास मोहिते कधीही डगमगली नाहीत.
लोकशाही न दिलेल्या अधिकाराचा ते पुरेपूर उपयोग करू लागले. लोकशाहीतील चौथा स्तंभ हा आजार घेऊन त्यांनी कोणत्याही चुकीच्या गोष्टीला आधार दिला नाही त्यांना जोडून काढण्याचे काम त्यांनी केले.त्यामुळे तिरंगा रक्षक आणि विश्वास मोहिते हे कराड तालुक्यातील पत्रकारितेतील एक नाव सर्वांच्या ओठावरती होते. बातम्या प्रसिद्ध होताना त्या त्या वेळेत त्या त्या काळात झाल्या पाहिजेत. काही बातम्यांना विलंब करून चालत नाही त्यांना काल मर्यादा असतात. साप्ताहिक मध्ये बातमी प्रसिद्ध करून त्या बातमीला कुठेतरी दिरंगाई झाली असे लक्षात येते.
अशा वाचकांच्या प्रतिक्रिया विश्वास मोहिते यांच्या कानापर्यंत येऊ लागल्या. आणि फास्ट लेखन, फास्ट प्रिंटिंग, फास्ट वितरण ही संकल्पना डोक्यात घेऊन आपले एखादे दैनिक असावे या उद्देशाने सन 2023 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची अवचित्य साधून दैनिक क्रांतिकारी जयभीम हे वृत्तपत्र त्यांच्या मूळ गावी पाडळी (केसे) तालुका कराड या गावातून प्रसिद्ध केले.
त्या दैनिकाला सर्वसामान्य नागरिकांतून दलित पद्धतीत वंचित घटकातून मात्र आपलं हक्काचे विचारपीठ म्हणून वाचकांनी दैनिक क्रांतिकारी जयभीम आणि विश्वास मोहिते यांना डोक्यावर घेतले आहे. सध्या तिरंगा रक्षक आणि क्रांतिकारी जयभीम यांच्या निर्भीड लेखणीमुळे विश्वास मोहिते यांचे नाव सातारा जिल्ह्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रात चर्चेत असले तरी आज पर्यंत त्यांनी केलेली पत्रकारिता सध्या सुरू असलेला लिखाणातील आणि पत्रकारितेतील संघर्ष नक्कीच इतरांना आदर्श दर्शक आहे. विश्वास मोहिते आपणास त्याच बरोबर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.*अस्लम शेख,रत्नागिरी*
Discussion about this post