
धर्माबादःतालूक्यातील करखेली येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थिनी उत्तुंग यश संपादन केले आहे.मागील वर्षी 24 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्रशाला धर्माबाद येथे झालेल्या एलिमेंटरी चित्रकला परीक्षेत 34 पैकी 34 विद्यार्थी विशेष प्रवीण्यसह उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक के.यस.लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे मुख्याध्यापक कबीरदास गंगासागरे , मोहन कावडे, खेडकर, वर्षा पाटील, शेख नाझीम, सुत्रावे, शेख अन्वर, एम.यस बोंबले, व प्रेम कुमार पनवाल यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे धर्माबाद तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे
Discussion about this post