मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची राज्य पातळीवर गेल्या पाच महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करण्यात आली आहे.या उपक्रमामुळे आपल्या राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी मिळाली आहे.
या योजनेंतर्गत सर्व प्रशिक्षणार्थीची विविध विभागातील शासकीय कार्यालयांतील आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्यात आली आहे.
सर्व प्रशिक्षणार्थी कामावर रुजूही झाले आहेत. त्यांना 6 महिन्याच्या कालावधी संपल्यावर कालावधी मध्ये वाढ,तसेच शासकीय नौकर भर्ती मध्ये 10 % जागा राखीव ठेवण्यात याव्या अश्या असायचे मागण्यांचे निवेदन मंठा तालुक्यातील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्या माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या कडे मागणी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्या अगोदरच्या दिवशी केलेल्या भाषणात लाडके भाऊ आणि लाडकी बहिणींच्या योजना आणि त्यांना दिलेली आश्वासने यांना प्राथमिकता दिली जाईल,असे आश्वासन दिले होते.
प्रशिक्षणार्थीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ह्या आशा निराशेत रुपांतरीत होऊ न देता प्रशिक्षणार्थी युवक युवतींना आहे त्याच आस्थापनेमध्ये कायमस्वरुपी नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करून देणे आणि मिळणाऱ्या मानधनामध्ये वाढ करून द्यावी. अशी मागणी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी मंठा तालुक्याच्या वतीने माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांना भेटून करण्यात आली आहे.
यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले की राज्याचे दूरदृष्टी असलेले संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत प्रत्यक्ष भेटून चर्चा करून समस्यांचे निराकरण काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी तालुक्यातील सर्वच प्रशिक्षाणार्थी उपस्थित होते.निवेदनावर प्रशिक्षणार्थी गोपाल जाधव,गजानन खंदारे,चंदू बोराडे,रामदास शेंडगे,विशाल अंभुरे,तुकाराम शेंडगे,जिवन राठोड, अनिल आढे,भिमराव चव्हाण, सोनिया आढे,गिता शिंदे,मनीषा गायकवाड, ताई सोनवणे,सचिन अंभुरे,वंदना राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Discussion about this post