पोलीस स्टेशन आर्णी.. ता.आर्णी.जि. यवतमाळ.. प्रतिनिधी मुरली राठोड मो 9307493402.
रेती चोरी करून वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टरवर आर्णी पोलिसांनी केली कारवाई दोन ब्रास रेतीसह एकूण 10. 08. O00. रू चा मुददे माल केला जप्त.. दिनांक 15/01/2025 रोजी रात्री 22.00 वा गोपनीय माहितीच्या आधारावर ग्राम पहूर नस्करी रोडवर आयशर ट्रॅक्टर क्र एम एच 29 एके 10 52 वर त्यामध्ये एक ब्रास रेती अवैधरित्या चोरून तीन वाहतूक करीत असताना मिळून असल्याने ट्रॅक्टर चालक नामे. आकाश सुरेश मिश्रा वय 32 वर्ष रा. पहूर नस्करी ता आर्णी जि यवतमाळ यांचेवर अपराध क्रमांक 22/2025 कलम 303 (2 ) बी एन एस सहकलम 48(8 ) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अन्वये नोंद करण्यात आला त्यानंतर दिनांक 16/01/2025 रोजी 16/00 वा सुमारास चांदापूर रोडवर एक स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर ज्याचे ट्रॉलीमध्ये एक ब्रास रेती भरून चोरटी वाहतूक करीत मिळून असल्याने चालक नामे. असलम फिरोज खान वय 24 वर्ष रा जवळा ता आर्णी जि यवतमाळ त्याचे वर अपराध क्रमांक 24/2025 कलम 303 (2 ) बी.एन.एस सहकलम 48(8 ) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अन्वये नोंद करण्यात आला या दोन्ही कारवाई मध्ये 02 ब्रास रेती व दोन ट्रॅक्टर व ट्रॉली एकूण किंमत अ. 10.08.000 रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे सदर ची महत्वपूर्ण कारवाई श्री कुमार. चिता साहेब पोलीस अधीक्षक यवतमाळ याचे आदेशाने श्री पियुष जगताप साहेब अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ व श्री चुलमुला रजनीकांत साहेब सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा याचे मार्गदर्शन खाली पोलीस निरीक्षक श्री केशव ठाकरे साहेब. पोहवा /2222 मनोज चव्हाण. पोहवा /2002 अतुल तागडे. पोहवा /2236 गुणवंत बोईनवाड. पोहवा /783 ऋषिकेश इंगळे पोका /2540. मंगेश जगताप चालक पोहवा /216 सचिन पिसे यांनी ही कामगिरी पार पाडली..

Discussion about this post