महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे बरेचसे घरकुल ग्रामपंचायत ला मिळाले असून ते योग्यरीत्या वाटप होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे प्रतप्रधान घरकुल योजने लाभार्थ्यांचे दयनीय अवस्था आज महागाईच्या काळात शासनाकडून घरकुला ला मिळत असलेली रक्कम ही अपुरी पडत आहे आज विटी चे भाव सिमेंटचे भाव व इतर सर्व गोष्टीचे भाव गगनाला भिडले
असून शासनाकडून मिळणाऱ्या लाभांमध्ये घरकुल होत नसल्याच्या चर्चा आणि त्यासोबतच मिस्तरीची मजुरी या सर्व बाबींचा विचार करता आज रोजी मिळत असलेल्या रकमेमध्ये घरकुल होत नसल्याच्या चर्चा घरकुल लाभार्थ्याकडून केल्या जात आहे
त्यासाठी शासनाने प्रत प्रधान घरकुल लाभार्थ्यांना किमान दोन लाख ते अडीच लाख रुपये ग्रामीण भागात घरकुलासाठी देण्यात यावे अशी मागणी घरकुल लाभार्थ्याकडून केल्या जात आहे आणि ते वाजवी पण वाटते
आज प्रत्येक गोष्टीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्या असून मिळत असलेल्या रकमेमध्ये घरकुल बांधणे शक्य नसल्याचे घरकुल लाभार्थ्याकडून बोलल्या जात आहे
शासनाकडून मिळत असलेल्या रकमेव्यतिरिक्त घरकुलासाठी काहींना तडजोड करावी लागते तर काहींना कर्ज स्वरूपात रक्कम घ्यावी लागत असल्याचे सर्वसामान्य लाभार्थ्याकडून चर्चेला उधाण आहे तरीही लोकप्रतिनिधी व आमदार खासदारांनी हा प्रश्न उचलायला हवा होता
पण अधिवेशनात मात्र कोणीही काहीही यावर बोललेलं नाही त्यासाठी लोकप्रतिनिधी आमदार खासदार व जिल्हा अधिकारी साहेब यांनी या बाबीकडे जातीने लक्ष घालून ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाच्या रकमेत वाढ करून देण्यात यावी अशी मागणी घरकुल लाभार्थ्याकडून केल्या जात आहेव ज्या लोकांना आधीचे घरकुले मिळाले आहेत
अशा लोकांचे पण नावे याही यादीमध्ये आहेत ज्या लोकांचे घर बांधलेली आहेत अशाही लोकांची घरकुल यादीमध्ये नावे असून त्यांची कागदपत्रे ग्रामपंचायत मार्फत फाईल तयार करण्यात येत असल्याच्या नागरिकांमध्ये चर्चा आहेतमग खऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ कधी मिळणार बरेच योग्य ते लाभार्थी हे या योजनेपासून अलिप्त राहत असल्याचे बऱ्याच नागरिकाकडून बोलल्या जात आहे
ज्या लोकांची घरे टिनाची व तटयाचि बनलेली आहेत ज्यांचे आर्थिक उत्पन्न कमी असून सुद्धा अद्यापही त्या लोकांना घरकुलाचा लाभ घेता आलेला नाही असे समाजामध्ये बोलल्या जात आहे असून हे मात्र तेवढेच खरे असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे तरी वरिष्ठ अधिकारी यांनी या सर्व बाबीची चौकशी करून घरकुल लाभार्थ्यासोबत न्याय करावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून जोर धरू लागली आहे
Discussion about this post