जांब (लंजेरा) :- जांब येथून २की.मीअंतरावर असलेल्या लंजेरा येथे दिनांक.१८, १९,२० जानेवारी २०२५ ला लंजेरा येथील मंडईच्या निमित्तान तीन दिवसीय आदर्श बैलाचा इनामी शंकर पट आयोजित करण्यात आला आहे. पोटाचे उद्घाटक म्हणून तुमसर/ मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे राहणार आहेत.
तर अध्यक्ष म्हणून प्रदीप पडोळे तुमसर/ मोहाडी विधानसभा प्रमुख हे राहणार आहेत. उपाध्यक्ष म्हणून संदीप ताले उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती जि.प भंडारा हे राहणार आहेत विशेष अतिथी म्हणून रितेश वासनिक सभापती पंचायत समिती मोहाडी व धर्मपाल धूर्वे सरपंच सोरणा/लंजेरा हे राहणार आहेत यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन या कार्यक्रम पार पडणार आहे.
शंकरपटाचे प्रथम बक्षीस २१,००० रुपये तर द्वितीय बक्षीस १८,००० रुपये व तृतीय बक्षीस १३,००० रुपये असे एकूण 21 बक्षीस राहणार आहेत. 19 जानेवारी संपूर्ण दिवसभर शंकर पटाचा कार्यक्रम चालणार आहे. तसेच 20 जानेवारी रोज सोमवारला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. बक्षीस वितरण.
राजू कारेमोरे आमदार तुमसर/मोहाडी विधानसभा क्षेत्र, संदीप ताले उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती जिल्हा परिषद भंडारा, व हरिभाऊ सपाटे माजी सरपंच सोरना/लंजेरा यांच्या हस्ते बक्षीस वितरणाच्या कार्यक्रम होणार आहे.
या तीन दिवसीय आदर्श बैलाच्या इनामी शंकर पटाला जास्त जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती पट समितीच्या सर्व सदस्यांनी व समस्त लंजेरा वासियांनी केली आहे.
Discussion about this post