९ आधिकार्यांचा या पथकात समावेश,
मुंबई :
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आधीचे विशेष तपास पथक (एस.आय.टी.) बरखास्त करून पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांच्या अध्यक्षतेखाली ९ अधिकाऱ्यांचे विशेष पथक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर स्थापन करण्यात आले आहे.
मस्साजोगचे
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींच्या चौकशीसाठी डॉ.बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने विशेष तपास पथक स्थापन केले होते.
परंतु त्यातील काही अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराड बरोबर निकटचे संबंध असल्याने तसेच त्यांची नियुक्ती किंबहुना बदल्या कराड याच्या सांगण्यावरूनच झाल्याचे आरोप होऊ लागल्यानंतर देशमुख कुटुंबियांनी तपास पथकातील अधिकाऱ्यांवर आक्षेप नोंदवले.
जर कराडचे निकटवर्तीय पोलीस तपास करणार असतील तर आम्हाला न्याय कसा मिळेल ?, असा खडा सवाल कुटुंबियांनी विचारला.
त्यावर राज्य शासनाने अंतिमत: विचार करून जुने विशेष तपास पथक बरखास्त करून नव्या पथकाची घोषणा केली.
आधीच्या तपास पथकाली अनेक आरोपी
वाल्मिक कराड च्या जवळचे होते किंबहुना संबंधित पोलीसांची
वाल्मिक कराड याच्याच प्रयत्नातून नियु्क्ती किंवा बदली झाली होती,
असे दबक्या आवाजात सांगण्यात येत होते.
चर्चेला पुष्टी देणारे फोटोही समाज माध्यमांत प्रसिद्ध होत होते.
अगदी निवडणुकीनंतर खांद्यावर गुलाल पडल्यावर वाल्मिक च्या गळ्यात गळे घातल्याचा एका पोलीसाचा फोटो माध्यमांतून समोर आल्यानंतर कुटुंबियांनी तीव्र आक्षेप नोंदवला.
जर असे अधिकारी तपास पथकात असतील तर आम्ही तपास निष्पक्ष होईल,
अशी अपेक्षा कशी ठेवायची ? असा रास्त सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
त्यानंतर भा.ज.पा. आमदार सुरेश धस यांनी शासकीय पातळीवरील जबाबदारी स्वीकारून पथकात फेरबदल होतील, यासाठी पाठपुरावा केला.
याकामी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आदेश निर्गमीत करण्याची विनंती केली.
अखेर फडणवीस यांनी आदेश देऊन पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांच्या अध्यक्षतेखाली नव्या विशेष तपास पथकाची नियुक्ती केली.
Discussion about this post