कळब : तालुक्यातील डोंगरखर्डा येथे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांमार्फत दरवर्षी रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले जाते. याही वर्षी ४ ते १९ जानेवारी २०२५ पर्यंत रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले असून आज १२ जानेवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र डोंगरखर्डा येथे या रक्तदान महायज्ञात स्व स्वरूप संप्रदाय कळंब तालुका सेवा समितिच्या वतीने डोंगरखर्डा परिसरातील १०१ जणांनी आज रक्तदान केले.
सदर रक्तदान शिबिराला जगदगुरुश्रींच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. सदर शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी गावातली प्रतिष्ठित नागरिक श्री. गजानन पंचबुद्धे, श्री.गुरूदेव राऊत, शासकीय ब्लड बँकेचे पी.आर.ओ.श्री.खडसे सर व त्यांचे सहकारी इतर मान्यवर तसेच सर्वच कळंब येथील स्व- स्वरूप संप्रदायातील भक्तगण उपस्थित होते. महाराष्ट्रात सिकलसेल, अॅनिमिया, थैलेसिमिया, हिमोफिलीया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर पेशंट जास्त प्रमाणात आढळतात. अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्त बाटल्या देण्याचे संप्रदायामार्फत निश्चित केले होते. या वर्षी सुध्दा जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने शासनाच्या रक्तपेढ्यांना एक लाख रक्तकुपिका देण्याचा संकल्प केला आहे.
या संकल्पपूर्तीसाठी संपूर्ण देशभरात एक हजार पेक्षा जास्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. डोंगरखर्डा येथे सुध्दा प्राथमिक आरोग्य केंद्र डोंगरखर्डा मध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात एकूण १०१ रक्तकुपिका संकलित करण्यात आल्या.
या सात दिवसांमध्ये आतापर्यंत रक्तदान शिबीर झालीत त्यामध्ये महाराष्ट्र शासनाला ६० हजारावरती रक्तकुपिका संकलित करून महाराष्ट्र शासनाला सुपूर्द करण्यात आल्या.अपघातात झालेला अतिरिक्त रक्तस्राव, पॅलेसोमिया, रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, प्रसूतिपश्चात रक्तस्राव, शस्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांमधे योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशावेळी एका मानवाचेच रक्त दुसऱ्या मानवाचे प्राण वाचवू शकते. कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही व दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येऊ शकत नाही, त्यामुळे रक्तदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.रक्तदान शिबिर म्हणजे, स्वेच्छेने रक्तदान करण्यासाठी आयोजित केलेले कार्यक्रम. रक्तदान हे महादान आहे आणि गरजू लोकांसाठी जीवनदान ठरत आहे. या रक्तदान शिबिरासाठी कळब तालुक्यातील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज कळब तालुका पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले
Discussion about this post